मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पश्चिम बंगालमधील ममता सरकार दिघा जगन्नाथ धामचा प्रसाद 'दुआरे सरकार' योजनेअंतर्गत वाटप करत आहे. हे प्रसाद जगन्नाथ मंदिर धाम ट्रस्टकडून बनवले जात नसून स्थानिक पातळीवर बनवले जात आहेत. गंभीर म्हणजे, प्रसाद इस्लाम समर्थक मिठाई विक्रेत्यांनी बनवल्याचे निदर्शनास आल्याने भाजपने सदर प्रकारास तीव्र विरोध दर्शविला आहे. दिघा जगन्नाथ धाम सांस्कृतिक केंद्रात प्रसाद वाटण्यासाठी निवडलेल्या चार रेशन विक्रेत्यांपैकी तीन मुस्लिम आहेत, त्यामुळे भाजपने याविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासारखे आहे.
भाजप नेते सुकांत मजुमदार यांनी या अधिसूचनेविरोधात ट्विट करत आवाज उठवला आहे. राणीनगरच्या ब्लॉक क्रमांक १ मधील 'दिघा जगन्नाथ धाम सांस्कृतिक केंद्र' च्या रेशन विक्रेत्यांना प्रसाद (मिठाई) पुरवण्यासाठी जारी केलेल्या अधिसूचनेमुळे आता स्थानिक हिंदूंमध्ये भीती निर्माण झाली आहे. या सूचनेची सत्यता प्रशासनाच्या तात्काळ निदर्शनास आणून देण्याची मागणी होत आहे. कारण या सूचनेत अनेक स्थानिक मिठाई दुकानांच्या मालकांची नावे आणि संख्या उघड झाली असून सूचीबद्ध केलेल्या चार मिठाई दुकानांपैकी तीन इस्लाम समर्खकांच्या मालकीची आहेत.