बालमृत्यूचा विळखा

Total Views | 38
 

 

भारतात दर दोन मिनिटात साधारणतः ५ बालकांचा जन्म होतो, पण त्यातली तीन अर्भके जन्मतःच मरतात, असा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या एका गटाने दिला. ही मुलं ज्या परिसरात जन्मतात, ज्या रुग्णालयात जन्मतात तिथली स्वच्छता, आरोग्य सुविधा या सगळ्या गोष्टी या बालमृत्यूस कारणीभूत आहेत. बाळ जन्मल्यानंतर किमान सहा महिने तरी बाळाची योग्य ती काळजी, स्तनपान यांमुळे बाळ सुदृढ बनते, मात्र या अहवालानुसार ही नवजात अर्भके आपल्या जन्मानंतर एका महिन्याच्या आतच मरण पावतात. त्यामुळे सध्याच्या घडीला बालमृत्यूचे प्रमाण जगभरात भारतात सर्वात जास्त आहे२०१७ एवढा भयंकर आहे की, गेल्या पाच वर्षांची नोंद करणेही नकोसे वाटते आहे. स्वाभाविकच हे प्रमाण गाव-खेड्यांमध्ये जास्त आहे, कारण लसीकरणाच्या सोयीसुविधा या गावोगावी पोहोचतात खर्‍या पण त्यांचा लाभ घेतला जातोय का, हेही पाहणे आता गरजेचे झाले आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात बालमृत्यूचे प्रमाण वाढते आहे, कारण तेवढी लोकसंख्या वाढते आहे. मग तेवढ्या आर्थिक तरतुदी आहेत का?, या सगळ्या प्रश्नांचा विचार करणे भारतासाठी गरजेचे झाले आहे. भारतात दरवर्षी दोन कोटी अर्भके जन्माला येतात आणि जगात जन्माला येणार्‍या मुलांपैकी तर, १८ टक्के मुलं फक्त भारतातच जन्मतात. परिणामी पोषणमूल्य आणि प्राथमिक आरोग्य सुविधा यांच्या अभावामुळे या बालकांचा होणारा मृत्यू ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. तर, वय वर्ष पाच असलेली बालके ही मोठ्या प्रमाणावर मलेरिया, न्यूमोनिया यांची लागण होऊन दगावतात, कारण त्यांच्यात प्रतिकारशक्तीचा अभाव असतो, याचेही कारण तेच, त्यांना योग्यवेळी न मिळणारी आरोग्य सुविधा आणि पोषक अन्न. युनिसेफच्या संचालकांनी या परिस्थितीवरून केलेले भाकीत आणखी भीतीदायक आहे. त्यांच्या मते जर ही परिस्थिती अशीच राहिली तर, २०३० पर्यंत जवळजवळ ५६ दक्षलक्ष बालके दगावतील. या मुलांना फक्त पोषण आहार आणि योग्य लसीकरणाच्या सोयीच वाचवू शकतील, असंही त्यांनी या अहवालात म्हटले. एकूणच परिस्थिती गंभीर असली तरी, १९९० पासून मुलांना वाचवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी युनिसेफ करतेय, त्यामुळे ही वास्तविकता बदलेल, अशी आशा.
 
 
  

उत्सव कि धिंगाणा?

 

 गणेशोत्सव म्हणजे लोकोत्सव अशी समज असणारे आता गणेशोत्सवात सहभागी व्हायलाही चाचपडत असतील. आधी सणाचा उत्सव झाला आणि आता, त्याचा धिंगाणा होतोय. मग त्यात मंडळांमध्ये होणारी मूर्तींच्या उंचीवरून, देखाव्यांवरून स्पर्धा. या उत्सवात डॉल्बींची जागा जरी ढोलताशांनी घेतली असली तरी, परिस्थितीत विशेष बदल झालेले मात्र दिसत नाहीत. गणपतीसमोर आरत्या आणि पार्वतीच्या बाळा अशा गाण्यांनी होणारी आरती आता बदलली आहे, ती उडत्या आणि अश्लील गाण्यांनी, म्हणजे त्या श्रीगणेशानेही आपले कान झाकावे, असा सगळा प्रकार एकीकडे, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या गावात म्हणजे परळीत सार्वजनिक गणपती मंडळाने तर चक्क बाप्पासमोर प्रदर्शन मांडले ते सपना चौधरीचे आणि मग चाहत्यांची आरडाओरड, पैशांची उधळण आणि मागे बाप्पा हे चित्र या सणाच्या मूळ निर्मितीवरच आघात करणारे आहे आणि या सगळ्याला प्रोत्साहन देणारे लोकप्रतिनिधी. हा सगळा प्रकार किंवा आपण याला धिंगाणा म्हणू, हा सुरू असताना धनंजय मुंडेही तिथे उपस्थित होते. सपना चौधरीसाठी खास सुरक्षा आणि तयारीही करण्यात आली होती आणि अर्थात खर्चही आणि या कार्यक्रमात होते काय तर उठवळ नाचगाणी. यात सपनाच्या नृत्य आविष्काराबरोबरच जमलेल्या तरुणांनीही धांगडधिंगाणा सुरू केला आणि बाप्पा आपला मागे स्तब्ध. हा सगळा एक प्रकार. तर दुसरीकडे, सणाच्या दिवशी ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा यासाठी गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीला न्यायालयाने बंदी घातली. यामुळे अनेक वादंग झाले, चर्चा झाली, मात्र, यामुळे जरी गणपती मंडळे हिरमुसली असली तरी, बाप्पा मात्र सुखावला आहे. पण मुळात या सगळ्या गोष्टींसाठी न्यायालयाला पडावे लागते, हेच मुळात न पटण्यासारखे. हा निर्णय नसून हा एका साध्या विचारसरणीचा भाग आहे. गणेशाचे आगमन आणि विसर्जन काय या आधी डॉल्बी आणि डीजे करायचे, नाही ना. टाळ-मृदुंंगाचा आवाजही ऐकावा कधीतरी, तेवढाच आपल्या आणि बाप्पाच्या कानाला आराम. या सणाला असलेले लोकोत्सवाचे रूप कदाचित टिळकांसोबतच गेले, आता उरला आहे तो फक्त धिंगाणा...
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

प्रियांका गावडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. वाचनाची आवड व क्रीडा विषयामध्ये विशेष रस. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण.

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121