मै झुकेगा नही ... एकनाथ शिंदे पुष्पा स्टाईल गरजले

    10-Feb-2025
Total Views | 26

Eknath Shinde
 
ठाणे : एकनाथ शिंदे कभी झुकता नही... सबको झुकाया.. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचा साधा कार्यकर्ता, पण मला हलक्यात घेऊ नका. असा गर्भित इशारा देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात पुष्पा सिनेमा स्टाईल गरजले. निमित्त होते, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मा. नगरसेवक राम रेपाळे यांनी किसन नगर येथे आयोजित केलेल्या "भाई भंडारा " या मोफत उपक्रामाचे. यावेळी शिंदे यांनी, राज्यात तसेच देशात कुठेही गेलो तर किसननगर मध्ये आल्यानंतर जो आनंद होतो तो वेगळाच असल्याचे नमुद केले.
 
०९ फेब्रु. रोजी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात अनेक कार्यक्रम पार पडले. लहानपणापासून किसननगर मध्ये वाढले त्यांनंतर शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक,आमदार,मंत्री, विरोधी पक्ष नेता ते या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्याचे नमुद करीत एकनाथ शिंदे यांनी यात किसननगरचे योगदान असल्याचे सांगितले. पक्षातील इनकमिंग बद्दल बोलताना, ही मंडळी तुमच्याकडून आमच्याकडे का येतात, याचा विचार करा, असा टोला उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला. पुढे बोलताना त्यांनी, एकनाथ शिंदे कभी झुकता नही, झुकाया सबको.. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचा साधा कार्यकर्ता आहे, मला हलक्यात घेऊ नका. असा इशाराही त्यांनी दिला. मी शब्दाचा पक्का माणूस आहे. शब्द दिला तर मागे फिरत नाही. एक बार कमिटमेंट करली तो मै खुद की भी नही सुनता.. हा माझा वादा आहे. असा वॉन्टेड चित्रपटातील डायलॉगही शिंदे यांनी मारला.
 
 पंतप्रधानांनी फोनवर दिल्या शुभेच्छा
 
भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी मला फोन केला, काय शिंदेजी कुठे आहात?, मी म्हणालो येथेच आहे… ते म्हणाले काय करत आहात? आज तुमचा वाढदिवस आहे… वाढदिवसाच्या तुम्हाला लाख-लाख शुभेच्छा. त्यांनी मला मराठीतून शुभेच्छा दिल्या. मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती, राज्यपाल सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. आता मी मुख्यमंत्री नाही. तरीसुद्धा त्यांनी मला आठवणीत ठेऊन शुभेच्छा दिल्याचे शिंदे म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121