मुंबई, वीजेचा वापर कमी करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. घरामधील एसी आता एका विशेष नियमा पर्यंत वापरता येणार आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी या नवीन तरतुदी जाहीर केल्या आहेत. ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी ही मोहिम चालवण्यात येत आहे. एअर कंडिशनर चे तापमान २०°C ते २८°C दरम्यान वापरणे बंधनकारक ठरेल. भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत हा मोठा बदल आहे.
भारतात उष्णता वाढत असल्या कारणाने अनेक लोक एअर कंडिशनरचा वापर करत आहेत, यामूळे वीजेचा वापर जास्त होताना दिसतो. घरांमध्ये आणि व्यावसायिक जागांमध्ये विजेचा वापर जास्त होतो. वीज बचत करण्यासाठी सरकार ने आता नवीन नियम व अटी लागू केले आहेत. एअर कंडिशनर चे तापमान २०°C ते २८°C दरम्यान चालवणे बंधनकारक ठरेल. या नियमांची माहिती केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिली आहे. तापमान आधिच सेट केलेले असेल.
मनोहर लाल खट्टर म्हणाले, “एअर कंडिशनिंग बाबत लवकरच एक नवीन तरतूद लागू केली जात आहे. एसीसाठी तापमान २०°C ते २८°C दरम्यान निश्चित केले जाईल, म्हणजेच एसी चे तापमान २०°C पेक्षा कमी थंड होऊ शकणार नाही किंवा २८°C पेक्षा जास्त गरम होऊ शकणार नाही.” ऊर्जा वापर कमी करण्यासाठी मंत्र्यांनी हे "धाडसी पाऊल" उचले आहे असे खट्टर यांनी वर्णन केले.
केंद्रानुसार सर्व एअर कंडिशनरचे तापमान मर्यादित केले जाईल, मग ती घरातील असो किंवा व्यावसायिक स्थळांवरील. याचा अर्थ एसी २०°C पेक्षा कमी किंवा २८°C पेक्षा जास्त सेट करू शकणार नाहीत. सध्या, बाजारात उपलब्ध असलेले अनेक एअर कंडिशनर १६°C किंवा १८°C पर्यंत कमी तापमान आणि ३०°C पर्यंत हीटिंग सेटिंग्जची परवानगी देतात. उत्पादकांना तापमान २०°C ते २८°C पर्यंत एसीचे वापर करण्यासाठी डिव्हाइसेस पुन्हा प्रोग्राम करावे लागतील किंवा सॉफ्टवेअर अपडेट करावे लागले. भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत हा मोठा बदल आहे.
किती वीज वाचवू शकतो?
एसीचे तापमान फक्त एक अंशाने वाढवल्याने विज वापर सुमारे ६ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. फक्त २०°C वरून २४°C पर्यंत तापमान वाढवल्याने २४ टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते, वीज कमी वापरल्याने बिल कमी येऊ शकते. भारतासारख्या उष्ण आणि दमट देशात खोली १६°C पर्यंत थंड करणे आवश्यक किंवा आरोग्यदायी नाही, लोकांना हे कळत नाही.
अनेक देशांनी आधीच असे नियम लागू केले आहेत, काही सरकारी आदेश म्हणून, तर काही सार्वजनिक मार्गदर्शक अटी म्हणून केले आहे. जपानमध्ये, पर्यावरण मंत्रालय उन्हाळ्याच्या महिन्यांत एअर कंडिशनर २८°C वर सेट करावेत, असे निर्बंध आहे. २०२२ मध्ये स्पेनने सार्वजनिक इमारती, कार्यालये आणि व्यावसायिक जागी थंड तापमान २७°C पेक्षा कमी न ठेवण्यास सांगणारा कायदा मंजूर केला. वाढत्या वीज किमती आणि हवामानामुळे हा नियम देशाच्या ऊर्जा-बचत योजनेचा एक भाग आहे.
मनोहर लाल खट्टर यांच्या नवीन घोषणेवरून असे सूचित होते की हे नियम अनिवार्य असतील. नियम सार्वजनिकरित्या तपशीलवार जाहीर केले नसले तरी, मंत्र्यांनी पुष्टी केली की एक नवीन तरतूद "लवकरच अंमलात आणली जात आहे". एअर कंडिशनर तापमान मर्यादित करणे हा एक किरकोळ प्रशासकीय बदल वाटू शकतो. परंतु ऊर्जा सुरक्षा, हवामान आणि ग्राहक बचतीसाठी नियमाचे फार चांगले फायदे होतील.