कुर्ला - वांद्रे रेल्वे मार्गाच्या मूळ रेखनाच्या पुनर्बहालीसाठी अनिल गलगली यांची जोरदार मागणी

    20-Jun-2025
Total Views | 14

मुबंई :  कुर्ला - वांद्रे रेल्वे मार्गाचे मूळ रेखन रद्द करून मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली रेल्वे स्थानकांची जागा बदलण्याचा एमएमआरडीएचा डाव उघड करत ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

या संदर्भात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिलाधिकारी, एमएमआरडीए, महापालिका, मेट्रो आणि वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकीत अनिल गलगली यांनी मांडलेले मुद्दे गंभीर असल्याचे मान्य करत, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

शेलार यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, "ही शुद्ध फसवणूक असून, मूळ रेल्वे रेखन रद्द करून खोट्या माहितीच्या आधारे नागरिकांची दिशाभूल करण्यात आली आहे." त्यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्याकडे पाठवण्याचे निर्देशही दिले.

अनिल गलगली यांनी चार मुख्य मागण्या केल्या. नगरविकास विभागाची १ ऑक्टोबर २०१८ ची अधिसूचना तात्काळ रद्द करावी. मूळ कुर्ला - वांद्रे रेल्वे रेखन पुन्हा लागू करावे. ई व जी ब्लॉक येथील रेल्वे स्थानकांची जागा राखून ठेवावी. संबंधित एमएमआरडीए अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कारवाई करावी.



'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121