अलिबागमध्ये होणार भक्ती-शक्तीचा संगम!

    21-Jan-2025
Total Views | 14

अहिल्यादेवी
 
रायगड - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ‘गाज फाऊंडेशन’ आणि ‘सावी फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘संस्कार भारती, रायगड जिल्हा’ यांच्या सहयोगाने ‘संगम शक्ती-भक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवार २५ जानेवारी रोजी ‘जयमाला गार्डन, ब्राह्मण माळी, अलिबाग, रायगड’ येथे सायंकाळी ५:३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘संगम भक्ती-शक्तीचा’ या कार्यक्रमाची संकल्पना रघुजी राजे आंग्रे यांनी केले असून डॉ. विशाखा मोडक या कार्यक्रमाच्या आयोजक आहेत. डॉ. समिधा गांधी या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. अनिरुद्ध भिडे आणि सहकारी यांनी या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले आहे. अधिकाधिक प्रेक्षकांनी सहकुटुंब या कार्यक्रमाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

राज्याची राजधानी मुंबई आण‍ि उपराजधानी नागपूर या दोन शहरांमधील अंतर केवळ आठ तासांवर आले आहे . या दोन शहरांना जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या आण‍ि महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण आज, गुरुवार दि.५ जून रोजी होणार असून इगतपुरी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे या ७६ किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचवेळी सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नव्या खाडीपूल ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121