मुंबई मेट्रो २ए व ७ या मार्गिकांना कार्बन-न्यूट्रल प्रमाणपत्र

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्रे प्रदान एमएमआरडीने हरित वाटचालीत गाठला महत्त्वाचा टप्पा

Total Views |
मुंबई मेट्रो २ए व ७ या मार्गिकांना कार्बन-न्यूट्रल प्रमाणपत्र

मुंबई, जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पर्यावरण शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एका विशेष सोहळ्यात मुंबई मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्बन न्यूट्रॅलिटी आणि कार्बन क्रेडिट प्रमाणपत्रे औपचारिकरित्या प्रदान करण्यात आली.

या सोहळ्यासाठी मुख्य सचिव, सुजाता सौनिक, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी आणि महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओसीएल) व्यवस्थापकीय संचालक, रुबल अगरवाल हे मान्यवर उपस्थित होते. या ऐतिहासिक कामगिरीतून मेट्रो २ए (दहिसर पूर्व ते डी. एन. नगर) आणि ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली) या मार्गिका कार्बन-न्यूट्रल कॉरिडॉर असल्याचे अधोरेखित होते आणि हरित व शाश्वत नागरी वाहतुकीकडे वाटचाल करण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना यामुळे अधिक चालना मिळेल.

जागतिक मानकांद्वारे मान्यता प्राप्त केलेली कामगिरी

एमएमएमओसीएलने या मार्गि


पुढील टप्प्यात, एमएमआरडीएने मेट्रो २बी, ४, ४ए, ५, ६, ७ए आणि ९ या बांधकामाधीन मार्गिकांची व्हेरा कार्बन रजिस्ट्रीत नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही संस्था हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावरील प्रमुख मानक मानली जाते. मेट्रो प्रणाली आणि रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांच्या प्रवासाच्या दर किलोमीटरमागील हरितगृह वायू उत्सर्जनाची तुलना केल्यावर तब्बल ८५,८४९ टन कार्बन डायऑक्साइडच्या समतुल्य इतक्या उत्सर्जनात लक्षणीय घट साधण्यात आली आहे.


"कार्बन न्यूट्रॅलिटी हे आता फक्त जागतिक उद्दिष्ट न राहता, स्थानिक पातळीवर पावले उचलण्याची गरज झाली आहे. एमएमआरडीएच्या मेट्रो यंत्रणेच्या माध्यमातून हवामानबदलाबाबत जागरूक असलेली मान्यताप्राप्त वाहतूक व्यवस्था उभारून महाराष्ट्राने या क्षेत्रात देशाचे नेतृत्व केले आहे, याचा अभिमान आहे."

 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

"एमएमआरडीएमध्ये शाश्वतता हा अंमलबजाणी केल्यानंतर विचारात घेण्यात येणारा पैलू नाही तर नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या केंद्रस्थानी हा विचार असतो. कार्बन न्यूट्रल मेट्रो सेवा असो, मल्टीमोडल एकत्रीकरण असो किंवा हरित वाहतूक उपक्रम असो, आम्ही हाती घेतलेली प्रत्येक योजना ही हवामानबदल प्रतिकारक्षम आणि पर्यावरणपूरक मुंबई घडवण्याच्या दृष्टिकोनातून आखलेली आहे. पायाभूत सुविधा प्रगत आणि त्याच वेळी पर्यावरणपूरकही असू शकतात, हेच या मान्यतापत्रातून सिद्ध होते"


- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए


"कार्बन न्यूट्रल मेट्रो मार्गिका प्रत्यक्षात आणल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. मान्यताप्राप्त कार्बन क्रेडिट्स आणि आगामी VEERA was प्रकल्पांच्या माध्यमातून एमएमएमओसीएल सार्वजनिक वाहतूक नेट-झीरोच्या दिशेने नेण्यात सक्रिय भूमिका बजावत आहे."


- रुबल अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, एमएमएमओसीएल


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.