‘मनी साहित्याची खाण, खाकी वर्दीलाही त्याचा अभिमान’

    17-Jan-2025
Total Views | 14

image
 
पुणे : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुजर- निंबाळकरवाडी शाळेचा कात्रज येथील सरहदसंस्थेच्या मुख्य शाखेमध्ये ‘मनी साहित्याची खाण, खाकी वर्दीलाही त्याचा अभिमान’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पोलिसांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा. व्यस्त दिनक्रमातही आपला छंद जोपासणारे एक वेगळे रूप विद्यार्थ्यांना पहावयास मिळावे व छंद जोपासण्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पोलिसांचा कार्यक्रम सरहद संस्थेसाठी अभिमानास्पद झाला. अप्रतिम कलाकृती सादर करताना त्यांचे वेगळेच रूप पहावयास मिळाले. पोलिसांची भीती न वाटता, वर्दीमध्ये एक मित्र लपलेला आहे ही भावना मुलांच्या मनी दृढ झाली. या कलाकृतींमध्ये महाराष्ट्राची शान पोवाडा, मराठी गीते, कविता असे विविध प्रकार होते.
 
पोलीस निरीक्षक किरण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा पुणे शहर नितीन जगताप, सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत माने, दामिनी पथक बालिका बिटले, पोलीस अधीक्षक, उदय बराटे, सह गायन निशाद थिटे, हार्मोनियम श्रीराम देशपांडे, तबला रोहित अडसूळ, या सर्वांनी अत्यंत मधुर आवाजात वातावरण मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला नलावडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संस्थेच्या सचिव सुषमा नहार मॅडम, संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, शाळेच्या विभागप्रमुख मनिषा वाडेकर, प्राथमिक विभाग प्रमुख कोमल दिवटे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक वर्ग, वाहतूक विभाग प्रमुख, तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकला रांजणे यांनी केले. संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले. किरण देशमुख व पांडुरंग वाघमारे यांच्या सुमधुर आवाजातील जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121