इलेक्ट्रो होमिओपॅथीसाठी कटिबद्ध

कल्याणमध्ये राज्यस्तरीय चर्चासत्रात नरेंद्र पवार यांचे आश्वासन

    13-Jan-2025
Total Views | 24
Narendra Pawar

कल्याण : समाजामध्ये हळूहळू लोकप्रिय होऊ लागलेल्या आणि वैद्यक क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या इलेक्ट्रो होमिओपॅथी क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी कटिबद्ध असल्याचे आश्वासन माजी आमदार नरेंद्र पवार ( Narendra Pawar ) यांनी दिले.

इलेक्ट्रो होमिओपॅथीचे जनक डॉ. काऊंट सिझर मॅटी यांच्या २१६व्या जन्मदिवसानिमित्त ‘इलेक्ट्रो होमिओपॅथी फाऊंडेशन’ महाराष्ट्रच्या माध्यमातून कल्याणमध्ये राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले, यावेळी पवार बोलत होते.

इलेक्ट्रो होमिओपॅथीला भारतात पूर्वीपेक्षा जास्त संरक्षण आणि महत्त्व दिले जात आहे. या उपचार पद्धतीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असून, इतर उपचार पद्धतीवर विश्वास ठेवणारेही आता इलेक्ट्रो होमिओपॅथीकडे वळू लागल्याचे गौरवोद्गार माजी आमदार पवार यांनी काढले.

इलेक्ट्रो होमिओपॅथी संघटनेचे राज्य सचिव डॉ. महेंद्र पवार यांनी नरेंद्र पवार यांचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, इलेक्ट्रो होमिओपॅथीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पी. एस. पांडे, राष्ट्रीय सचिव डॉ. सुरेंद्र पांडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. प्रदीप तिवारी, सचिव डॉ. महेंद्र पवार, राष्ट्रीय खजिनदार डॉ. बापू पाटील यांच्यासह महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. रमेश यादव, मुंबई अध्यक्ष डॉ. राकेश तिवारी, महाराष्ट्र खजिनदार डॉ. प्रभाकर विश्वकर्मा, पालघर अध्यक्ष डॉ. यू. बी. सरोज, ठाणे शहर अध्यक्ष डॉ. त्रिलोकनाथ गुप्ता, ठाणे ग्रामीण अध्यक्ष डॉ. देवराज पाल, ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष डॉ. मनोज वाघ, ठाणे ग्रामीण सचिव डॉ. सुनिल पाटील असे ३०० सदस्य यावेळी उपस्थित होते.

अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

इलेक्ट्रो होमिओपॅथी क्षेत्रासमोर सध्या काही तांत्रिक, तर काही शासकीय स्तरावरील अडचणी आणि समस्या आहेत. परंतु, महाराष्ट्र राज्य असो की, केंद्र सरकार, या दोन्ही ठिकाणी गतिमान आणि कृतिशील असे भाजप सरकार कार्यरत आहे. त्यामुळे इलेक्ट्रो होमिओपॅथी क्षेत्रासमोरील या अडचणी सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन पवार यांनी उपस्थित डॉक्टरांना दिले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121