मुंबई विद्यापीठ सेंटर फॉर डिस्टन्स अॅण्ड ऑनलाइन लर्निंगच्या संचालकपदी : डॉ. शिवाजी सरगर
12-Jul-2024
Total Views | 53
मुंबई : प्रा. डॉ. शिवाजी सरगर यांची मुंबई विद्यापीठ सेंटर फॉर डिस्टन्स अॅण्ड ऑनलाइन लर्निंगच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. 12 जुलै रोजी ते संचालकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. डॉ. शिवाजी सरगर हे गेली 30 वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी गेली 10 वर्षे मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
डॉ. सरगर यांचा विद्यापीठ तसेच अध्यापन क्षेत्रात दांडगा अनुभव आहे. डॉ. शिवाजी सरगर हे मूळचे कराडमधील उंब्रज तालुक्याचे. अत्यंत गरिबीतून संघर्ष करत डॉ. शिवाजी सरगर यांनी शिक्षण घेतले. प्रचंड कष्टातून त्यांनी त्यांचे अस्तित्व निर्माण केले. संपर्कातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी डॉ. सरगर नेहमी अग्रेसर असतात.