'उबाठा' गटाकडून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न?
भांडुपमधून दोन जणांना अटक; मतदान केंद्राबाहेर दाखवले प्रात्यक्षिक
20-May-2024
Total Views | 66
मुंबई : एकीकडे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असताना, ईशान्य मुंबईत उबाठा गटाकडून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रकार सोमवार, दि. २० मे रोजी उघडकीस आला. ईव्हीएम मशिनवरील नेमके कोणते बटन दाबावे, याचे प्रात्यक्षिक मतदान केंद्राबाहेर डमी मतदान यंत्राद्वारे उबाठा गटाकडून सुरू होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
भांडुप येथील मतदान केंद्राबाहेर हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येताच, पोलिसांना त्यावर हरकत घेतली. त्यानंतर उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांशी हुज्जत घातली. मात्र, त्यांच्या दबावतंत्रापुढे न झुकता पोलिसांनी दोघा कार्यकर्त्यांना अटक करीत त्यांना निवडणूक पथकाच्या स्वाधीन केले.