'जोकर २'चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित; जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा दिसणार प्रमुख भूमिकेत
10-Apr-2024
Total Views | 41
तब्बल ५ वर्षांनी जोकर चित्रपटाचा सीक्वेल येणार भेटीला
मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रितिक्षित 'जोकर: फोली ए ड्यूक्स' (Joker 2) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलही भेटीला आला आहे. जोकर या चित्रपटाचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे चित्रपटाचा पुढचा भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष असताना आता ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘जोकर’ (Joker 2) हा २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तब्बल ५ वर्षांनी जोकर चित्रपटाचा सिक्वेल येणार असून यात जोक्विन फिनिक्स पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची भूरळ चाहत्यांवर पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.
'जोकर: फोली ए ड्यूक्स' चा ट्रेलर निर्मात्यांनी शेअर करत लिहिले आहे की, “आता तो एकटा नाही, 'जोकर: फोली ए ड्यूक्स' 4 ऑक्टोबर २०२४ रोजी थिएटरमध्ये येत आहे''. 'जोकर: फोली ए ड्यूक्स'च्या ट्रेलरची सुरुवात जोक्विन फिनिक्स पात्र आर्थर फ्लेक (जोकर) पासून होते, जो तुरुंगात शिक्षा भोगत असतो. त्यानंतर तो हार्लीला भेटतो आणि स्वत:च्या जगात आयुष्य जगू लागतो. या चित्रपटाची खासियत म्हणजे जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा एकत्र दिसणार असल्यामुळे चाहत्यांसाठी हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
‘जोकर २’ हा अमेरिकन म्युझिकल सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी टॉड फिलिप्स आहेत. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी 'जोकर: फोली ए ड्यूक्स' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.