प. बंगालचा हिंदू जागा होत आहे!

    15-Jun-2025   
Total Views | 32

गेल्या दशकभरात ममता बॅनर्जींच्या राजवटीत प. बंगालमधील हिंदूंचे जीणे अतिशय कष्टप्रद झाले. भारतात राहणार्या या हिंदूंच्या वाटेला दुय्यम नागरिकत्वाचे सर्व भोग आले. राजकीय महत्त्वाकांक्षेपायी मुस्लीम लांगूलचालनाच्या सर्व मर्यादा ममता बॅनर्जी यांनी बिनदिक्कत ओलांडल्या. ओबीसी प्रवर्गातातून मुस्लिमांना आरक्षण देताना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. स्वभवतः सहिष्णू असलेला हिंदू त्याच्या न्याय हक्कांसाठी जागा होत असल्याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यासाठी त्यांनी विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचा घेतलेला आढावा...

बंगालमध्ये सातत्याने दंगली उसळत आहेत, हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मात्र, ममता बॅनर्जींचे सरकार यावर ठोस कारवाई करताना दिसत नाही. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी फुरफुरा शरीफचा दर्ग्याचे पिरजादे कासिम सिद्दीकी यांची नियुक्ती केली आहे. तसेच, ओबीसी प्रवर्गातही बदल केले आहेत. नावातच वेगळेपणा असलेला फुरफुरा शरीफचा दर्गा, प. बंगालच्या दंगली आणि नव्याने ओबीसी प्रवर्गात राज्य स्तरावर ममता बॅनर्जी यांनी केलेले बदल या सगळ्यांचा मागोवा या लेखात घेतला आहे.

"मी काशीविश्वेश्वर किंवा जगन्नाथाच्या मंदिरात गेले, तर मला प्रश्न विचारत नाहीत. पण, फुरफुरा शरीफच्या दर्ग्यात गेले, तर भाजपवाले लगेच का प्रश्न विचारत आहेत,” असा तृणमूलच्या नेत्या आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्न विचारला आहे.

या अनुषंगाने दर्ग्याचा मागोवा घेताना जाणवले की, मुस्लिमांसाठी अजमेर शरिफ दर्ग्यानंतर दुसर्या क्रमांकाचा महत्त्वाचा दर्गा आहे, प. बंगालच्या हुगळी शहरातील फुरफुरा शरीफचा दर्गा. या दर्ग्यामध्ये हजरत शाह कबीर हलीबी और हजरत करमुद्दीन यांची मजार आहे तसेच, हजरत अबु बकर सिद्दीकी आणि त्यांच्या पाच मुलांची मजार शरीफ अर्थात मकबराही आहे, यालाच ‘पंच हुजूर केबला’ म्हणतात. या दर्ग्यामध्ये मजार असलेले हजरत शाह कबीर हलीबी और हजरत करमुद्दीन कोण? तर १४व्या शतकामध्ये सध्याचे पश्चिम बंगाल मात्र पूर्वीच्या बांगलाच्या एका भागावर आक्रमण केले, त्यावेळी तिथे राजा बागडीचे राज्य होते. तेव्हा हजरत शाह कबीर हलीबी और हजरत करमुद्दीन या परकीय आक्रमकांनी, त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना पराजित केले. आज कित्येक शतके लोटली, बागडी राजाच्या राजसत्तेचे स्मरण कुणालाच नाही. मात्र, त्यांच्यावर आक्रमण करणार्यांची मात्र मजार बांधली गेली. तसेच, मोहम्मद अबु बकर सिद्दीकी कोण? प. बंगालमध्ये १९व्या शतकामध्ये मदरसा मशिदी बांधण्यामध्ये यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच, ‘खिलाफत चळवळ’ आणि ‘स्वतंत्र पाकिस्तान’ निर्मितीसाठीही अबु बकर यांची भूमिका स्पष्ट होती. असे म्हटले जाते की, हे सिद्दीकी कुटुंब इस्लामच्या पहिला खलिफा अबु बकर यांचे वंशज होते. तसेच, पुढे भारतात या वंशजांनी औरंगजेबाशी संधान साधले होते, तर या अबु बकर सिद्धीकीचा दर्गाही इथे आहे आणि त्यांना ‘हजरत’ म्हणून मान दिला आहे. या अबु बकर सिद्धीकी आणि आक्रांता बनून आलेल्या हजरत शाह कबीर हलीबी किंवा हजरत करमुद्दीन यांची मजार असलेला हा फुरफुरा शरीफच्या दर्गा. दरवर्षी इथे मेळा असतो आणि हजारो मुस्लीम आणि त्याहीपेक्षा मनोभावाने हजारो हिंदू या दर्ग्यात येतात आणि या मजारींची पूजा करतात. तर असा हा धार्मिक(?) वारसा असलेल्या फुरफुरा शरीफच्या दर्ग्यामध्ये, ममता बॅनर्जी अत्यंत भक्तिभावाने गेल्या. ही अशी ममता बॅनर्जींची बंगाली अस्मिता!

अयोध्येतल्या राम मंदिराबद्दल कुत्सित मत व्यक्त करणार्या ममता बॅनर्जी, फुरफुरा शरीफच्या दर्ग्यामध्ये गेल्या. तिथे ईद साजरी केली आणि या दर्ग्याच्या सुफी संताच्या वारसदाराला म्हणजे पिरजादा कासीम सिद्दीकी यांना, तृणमूल काँग्रेस पक्षाचा सचिव म्हणून नियुक्तही केले. ना पक्षप्रवेश ना स्वागत, थेट नियुक्तीच. कासीमला थेट पक्षात नेतृत्व देण्यामागे ममता बॅनर्जींना कागदोपत्री २७ टक्के, पण वास्तवात ३३ ते ३५ टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लीम मतदारांना खुश करायचे आहे. तसेच, या दर्ग्याबद्दल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेसला भारी प्रेम! त्यातच या दर्ग्याच्या सध्याच्या एका पिरजाद्याने अब्बास सिद्दीकीने ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. ‘कुराण’ आणि ‘नबी’चा जाणते अजाणतेपणी अपमान करणार्या व्यक्तींचे ‘सर तन से जुदा करायलाच हवा,’ असे म्हणतानाचा त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध आहे. या अब्बासने ३८ मुस्लीमबहुल मतदारसंघात उमेदवार उभे केले, त्यातून हुगळीच्या एकमात्र सीटवरून अब्बास सिद्दीकीचा भाऊ नौशाद सिद्दीकीच जिंकला. मात्र, मुस्लीम मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात झाली. कारण, फुरफुरा शरीफचे प. बंगालच्या दोन हजार ५०० मशिदींवर नियंत्रण आहे. (या मशिदीद्वारे त्यांना पाहिजे तो फतवा फुरफुरा शरीफचे प्रमुख काढू शकतात) तसेच, प. बंगालच्या ८० मतदारसंघांमध्ये या दर्ग्याचे वर्चस्व आहे. जिथे जिथे मुस्लीम बहुसंख्य वस्ती आहे, तिथे या फुरफुरा शरीफचा दबदबा आहे. कारण, या मुस्लिमांच्या मते फुरफुरा शरीफचे सध्याचे प्रमुख, हे साक्षात मुस्लिमांच्या पहिल्या खलिफाचे वंशज आहेत.

या सगळ्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी कासिम सिद्दीकीला, थेट त्यांच्या तृणमूलचा राष्ट्रीय सचिव केले. यातून सिद्ध एकच होते की, ममता बॅनर्जी या मुस्लिमांच्या मतांसाठी आणि सत्तेसाठी काहीही तडजोड करू शकतात. त्याचीच एक चुणूक म्हणजे, ममता बॅनर्जींनी ओबीसी प्रवर्ग आणि आरक्षणाबद्दल केलेली तजवीज. नुकत्याच त्या म्हणाल्या की, "ओबीसी प्रवर्गात कोणत्या समाजाचा समावेश असावा हे धर्मानुसार नाही, तर त्या समाजाच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीनुसार ठरणार.”

ममता यांच्या सत्ताकाळात इतर मागासवर्गीय ‘अ’ प्रवर्गामध्ये ८१ जातींना आरक्षण होतेे. मात्र, यामध्ये ५६ मुस्लीम जातींना आणि केवळ २५ हिंदू जाती वर्गिकृत होत्या. तर इतर मागासवर्गीय ‘ब’ प्रवर्गामध्ये ९९ जातींना वर्गिकृत केले होते. त्यामध्येही ४१ समाज हे मुस्लीमच होते. याचाच अर्थ १७९ इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये, ११८ मुस्लीम जाती होत्या. या १७९ समाजामध्ये ममता यांनी त्यांच्या सत्ताकळात ७७ नव्या जातींना समाविष्ट केले. यामध्ये ७७ पैकी ७५ मुस्लीम जातींना इतर मागासवर्गीयाचा दर्जा ममता यांनी बहाल केला होता. तसेच, सात टक्के आरक्षण १७ टक्क्यांवरही नेले. अर्थात याचा जास्तीत जास्त लाभ मुस्लीम जातींनाच होता. मात्र, ममतांचा दरारा असा की, याविरोधात कुणीही कायदेशीर भूमिका घेतली नाही मात्र, उच्च न्यायालयाने या विरोधात स्वत:च प्रश्न उपस्थित केले. त्यानुसार, उच्च न्यायालयाने ७७ जातींचा ओबीसी प्रवर्गाचा दर्जा रद्दही केला तसेच, न्यायालयाने स्पष्ट केले की, ओबीसी प्रवर्गासाठी सात टक्केच आरक्षण राहणार, १७ टक्के नाही. अर्थात या जातींना कोणत्याही संविधानिक आधाराशिवायच, ममताने ओबीसीचा दर्जा दिला होता. त्यावेळीही ममता म्हणाल्या होत्या की, "मी न्यायालयाचा आदेश मानणार नाही.” मात्र, यावेळी ममता २०११ सालासारखे थेट मुस्लीम समाजाचे लांगूलचालन करू शकल्या नाहीत. हिंदू जागा झाला आहे याची जाणीव त्यांना झालीच. त्यामुळे त्यांनी राज्य ओबीसी आयोगाच्या सर्वेक्षणनुसार ६१ हिंदू आणि ७९ मुस्लीम जातींना ओबीसी सूचीमध्ये वर्गिकृत केले. तसेच, आरक्षणाची मर्यादा सातवरून पुन्हा १७ टक्के केली.

तर अशाप्रकारे ममता यांच्या सत्ताकाळात हिंदूंना दुय्यम नागरिकत्व स्वीकारावे लागत आहे. पण, केंद्रात भाजप सरकार आले, अयोध्येमध्ये रामललांची स्थापना झाली आणि प. बंगालमधला हिंदू जागा झाला. कट्टरपंथीना जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, सरकार ममता यांचे असल्याने आणि त्यांची ममता हिंदूंसोबत नसल्याने, हिंदूंवर तृणमूल सरकार सातत्याने कडक कारवाई करत राहिले. आताही २४ परगणा जिल्ह्यात दंगल उसळली, शिवमंदिराबाहेर मुस्लिमांनी दुकान टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला स्थानिक हिंदूंनी विरोध केला, तर त्या हिंदूंची घरे तोडली गेली, फोडली गेली. पोलीस आले, तर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. हे सगळे लोकांसमोर यावे म्हणून मीडियाकर्मी तिथे गेले, तर त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. मात्र, ममतांचे तृणमूल सरकार या विरोधात प्रखर कारवाई करत नाही, का? तर तिथे हिंदूंवर अत्याचार होत आहे आणि अत्याचार करणारे ममतांचे लाडके मतदार आहेत. मागेही ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या विरोधात प. बंगालमध्ये हिंसा झाली. अर्थात हिंसा संपूर्ण प. बंगालमध्ये होत नाही. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची केंद्रे जशी तीन-चार जिल्ह्यातच आहेत. तसेच, प. बंगालमध्येसुध्दा कट्टर धर्मांधाचा दहशतवाद तीन-चार जिल्ह्यांतच आहे, जसे की २४ परगणा, मुर्शिदाबाद आणि दिनाजपूर वगैरे. या तीन-चार जिल्ह्यातील हिंदूंनाच धर्मांधांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच ते तिथून पलायन करतात. दुसरीकडे याच जिल्ह्यांमधून रोहिंग्या किंवा बांगलादेशातले घुसखोरही मोठ्या प्रमाणात घुसखोरी करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी विरुद्ध सजग हिंदू असे वातावरण निर्माण होऊ शकते, याची जाणीव ममतांना आहेच. त्यामुळे मुस्लीम मतांची बेगमी लाटण्यासाठी त्या वाटेल ते करत आहेत. पण, काहीही झाले, तरी पश्चिम बंगालचा हिंदू जागा होत आहे!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121