संरक्षण क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता - सीमांच्या रक्षणासाठी नवसामर्थ्य

    13-Jul-2025
Total Views | 5


रविवारी नेहमीप्रमाणे जयंतराव, आदित्य आणि त्यांची मित्रमंडळी हॉटेलमध्ये जमली होती. मागच्या काही आठवड्यात आदित्यने ‘एआय’चा वापर शिक्षण, आरोग्य, शेती अशा क्षेत्रांमध्ये कसा होतो हे सांगितले होते. आज मात्र विषयच वेगळा होता, एआय आणि भारतीय संरक्षण क्षेत्र.


आदित्य म्हणाला, आजोबा, नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय नौदलाने आणि लष्कराने ‘एआय’ची मोठ्या प्रमाणावर मदत घेतली. काही संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यावर भारतीय नौदलाने, आपल्या युद्धनौका, ड्रोन, आणि एआय नेटवर्क पूर्ण ताकदीने सज्ज केले. काही तासांतच उपग्रह डेटा, ड्रोन फीड्स आणि ‘एआय’आधारित विश्लेषणाच्या मदतीने, शत्रूच्या हालचाली अचूक ओळखल्या गेल्या. भारतीय नौदलाने योग्य ठिकाणी कारवाई करून परिस्थितीवर ताबाही मिळवला.

जयंतराव गोंधळले, म्हणजे आपल्याकडे इतके प्रगत तंत्रज्ञान आले आहे? युद्ध म्हणजे शत्रूपेक्षा जास्त माणसं, मोठे धैर्य आणि रणभूमीवर समोरासमोर लढणे. आता संगणकांनी युद्ध लढायचे का? नाही हो आजोबा, आदित्य हसत म्हणाला. आजही जवानांचे धैर्य नक्कीच सर्वोच्च महत्त्वाचे आहे पण, ‘एआय’ हे त्यांच्या पाठीशी असलेले अदृश्य कवच आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून, जवानांना थेट धोयात न टाकता आधीच परिस्थितीचा अभ्यास करता येतो.

आयएनएस सुरत-भारतीय नौदलाचे ‘एआय’वर चालणारे शक्तिकेंद्र


आदित्यने पुढे सांगितले, याच ऑपरेशनमध्ये ‘आयएनएस सुरत’ या आपल्या नौदलाच्या नव्या ‘एआय’ सक्षम विध्वंसक जहाजाने, महत्त्वाची भूमिका बजावली. हे जहाज भारतातच बांधले गेले आहे आणि पूर्णपणे आधुनिक एआय प्रणालींनी सज्ज आहे. आयएनएस सुरत जवळपास सात हजार, ४०० टन वजनाचे आणि १६० मीटर लांबीचे असून, यात प्रगत रडार, सोनार आणि ‘एआय’ आधारित युद्धनियंत्रण यंत्रणा आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये या जहाजाने उपग्रह आणि ड्रोन डेटा काही सेकंदांत ‘एआय’द्वारे प्रोसेस करून, शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेतला. यामुळे भारतीय नौदलाला त्वरित कारवाई करता आली.

आकाशतीर-भारतीय लष्कराचे ‘एआय’आधारित हवाई संरक्षण

भारतीय लष्कराने ‘एआय’ वापरून ‘आकाशतीर’ नावाची अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली तयार केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘आकाशतीर’ने शत्रूचे ड्रोन आणि णअती अचूकपणे टिपले व निष्प्रभ केले.

‘आकाशतीर’ अनेक रडार, इलेट्रॉनिक सिग्नल, आणि ‘एआय’ डेटा प्रोसेसिंग यांचे जाळे आहे. एखादा शत्रू ड्रोन सीमारेषेवर आला की, ‘आकाशतीर’ लगेच त्याची गती, उंची, पॅटर्न ओळखून आपल्या क्षेपणास्त्रांना सज्ज करते आणि काही मिनिटांतच अतिक्रमण करणारे क्षेपणास्त्र, ड्रोन निष्क्रिय होते. पूर्वी माणसांवर ही जबाबदारी होती. काही सेकंदात निर्णय न घेतल्यास शत्रूची ड्रोन आत शिरायची. आता ‘एआय’मुळे हा वेळ वाचतो आणि निर्णयही अचूक होतो.

‘आकाशतीर’ ही भारतीय लष्कराने ‘डीआरडीओ’ आणि ‘बीईएल’च्या मदतीने विकसित केलेली, एक अत्याधुनिक एअर डिफेन्स कंट्रोल प्रणाली आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) महत्त्वाची भूमिका बजावते. एआय अल्गोरिदम हे या सगळ्या स्रोतांकडून आलेली माहिती, काही सेकंदात एकत्र करतात आणि त्यातून आक्रमण करणार्या ड्रोनचा मार्ग कसा असेल, याचा अंदाज घेतला जातो.

उदाहरणार्थ, शेकडो ड्रोन एकाच वेळी सीमारेषेवर दिसले, तर पारंपरिक रडारवर हे फक्त अनेक बिंदूंसारखे दिसतील. ‘आकाशतीर’मधील ‘एआय’ लगेच त्यांचा उड्डाण पद्धती, उंची व वेग यावरून ठरवते की, हे पक्ष्यांचा थवा आहे की ड्रोन आहे. जर ड्रोन आक्रमण असेल, तर ‘एआय’ लगेच प्रतिसादासाठी योग्य यंत्रणा निवडते. जसे काही सेकंदात त्यांना इलेट्रॉनिक जॅम करायचे की, थेट लेझर शस्त्र वापरायचे.याचबरोबर ही ‘एआय’ प्रणाली शत्रूचा पुढचा मार्ग व लक्ष्य सूचवते. उदा. जर ड्रोन शस्त्रास्त्र साठ्यावर धडक देण्याचा प्रयत्न करत असेल, तर ‘आकाशतीर’ त्याआधीच त्या परिसरात संरक्षणासाठी शस्त्र उभे करते किंवा ‘इलेट्रॉनिक वॉरफेअर युनिट’ सक्रिय करते. यामुळे मानवी ऑपरेटरवर त्वरित निर्णय घेण्याचा दबाव राहत नाही. ‘एआय’ स्वयंचलितपणे विश्लेषण करून (जैमिंग) (गन, मिसाईल, लेझर) वापरायचे हे ठरवते आणि ते अंमलातही आणते. त्यामुळे शत्रूच्या ड्रोन किंवा मिसाईल यांना जवळपास शून्य संधी मिळते.

उपग्रह आणि ‘एआय’ची भागीदारी

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘इस्रो’च्या उपग्रहांनी, शत्रूच्या हालचालींचे उच्च-रिझोल्यूशन छायाचित्रे पाठवली. ही चित्रे काही मिनिटांत नौदल नियंत्रण कक्षात पोहोचली. मग ‘एआय’ने या माहितीचे जलदगतीने विश्लेषण करून, संशयास्पद ठिकाणांचे नकाशे तयार केले गेले.

‘एआय’ ड्रोन आणि ‘स्वार्म’


भारताकडे आता ‘डीआरडीओ’च्या ‘स्वार्म ड्रोन’ प्रकल्पामुळे ‘एआय’वर चालणार्या झुंडीसारख्या ड्रोनची ताकद आहे. ‘स्वार्म ड्रोन’ म्हणजे अनेक लहान ड्रोनचा समूह, जो पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे समन्वय साधून एकत्र उडतो आणि गुंतागुंतीच्या मोहिमा स्वयंचलितपणे पार पाडतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हे ड्रोन एकमेकांशी थेट संवाद साधतात, मोयाच्या क्षणी गरज पडल्यास रणनीती बदलतात आणि मानवी आदेशांची वाट न पाहता झटपट निर्णयही घेतात. ‘एआय’ त्यांना गुप्तहेरगिरी, इलेट्रॉनिक युद्ध आणि आत्मघातकी हल्ले यांसारख्या मोहिमांत अचूकता देतो. तसेच ‘एआय’द्वारे रडार यंत्रणा शत्रूच्या ड्रोनचा जलद शोध घेऊन, त्यांना नष्ट करणे परिणामकारकपणे करता येते. त्यामुळे ‘एआय’ फक्त उडणार्या ड्रोनना स्मार्ट, स्वायत्त लढाऊ साधनांमध्ये रूपांतरित करून आधुनिक रणभूमीची रणनीतीच बदलून टाकते.

सायबर वॉरफेअर व ‘एआय’

‘एआय’चा वापर फक्त रणभूमीवर नाही, तर सायबर युद्धातही होतो. भारतीय लष्कराची ऊशषशपलश उूलशी असशपलू आणि उअखठ (उशपीींश षेी अख ठेलेींळली) सतत शत्रूच्या नेटवर्कवर नजर ठेवतात. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानसुद्धा या संस्थांनी, शत्रूच्या रेडिओ सिग्नलमध्ये हस्तक्षेप करून त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण केला.

भारतीय संरक्षणदलांना हवेत अजून ‘एआय’ तज्ज्ञ

पण, या सगळ्याचे एक मोठे सत्य आहे, आदित्य म्हणाला. भारतीय सैन्याला आता अजून ‘एआय’ तज्ज्ञ, डेटा सायंटिस्ट, अभियंते हवेत. कारण, पुढची युद्धं ही माहितीवर आधारित असणार आहेत. त्यामुळेच आज भारतीय लष्कर अधिक अभियंते, टेनिकल ऑफिसर भरती करत आहे.

भारतात स्वार्म ड्रोन, ‘एआय’ व आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानासंदर्भातील कौशल्य प्रशिक्षण देणार्या अनेक प्रतिष्ठित संस्था आहेत. ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), पुणे’ व ‘भारतीय लष्कर अकादमी (आयएमए), देहरादून येथे, नवे कॅडेट्स शारीरिक व नेतृत्व प्रशिक्षणासोबतच ‘एआय’ व स्वयंचलित युद्धतंत्र यावर मूलभूत ज्ञान घेतात. तसेच, ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन’ व ‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे’ येथे अधिक प्रगत स्तरावरील सिम्युलेशन, इलेट्रॉनिस व ‘एआय’आधारित युद्ध प्रणालींचे प्रशिक्षण दिले जाते. ‘डीआरडीओ’ व त्याअंतर्गत अऊए, उअइड यांसारख्या प्रयोगशाळांमध्येही संशोधनाशी संलग्न इंटर्नशिप्स व प्रकल्पांमधून तरुण अभियंत्यांना थेट प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळते. याशिवाय खखढी, खखखढी व छखढी यांसारख्या तंत्रशिक्षण संस्थांमध्येही संरक्षण संबंधित ‘एआय’, डेटा फ्यूजन व रोबोटिसवर विशेष अभ्यासक्रम व संशोधन प्रकल्प चालवले जातात, जेथे डीआरडीओ, इएङ, कअङ यांसारख्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्या थेट सहभागी होतात. यामुळे भारताला भविष्यातील स्वयंचलित युद्ध व हवाई संरक्षणासाठी प्रशिक्षित अभियंते व तंत्रज्ञ मिळतात. यामुळे भविष्यातले अधिकारी हे फक्त रणभूमीवर शौर्य गाजवणारे नसतील, तर डिजिटल रणभूमीवरही तितकेच ताकदीचे असतील.

तंत्रज्ञान व देशभक्ती

जयंतराव भारावून गेले. पूर्वी रणभूमीवर शत्रूला रोखण्यासाठी तलवारी, बंदुका, रणगाडे वापरले. आज मात्र संगणक, उपग्रह, आणि ‘एआय’ हेच आपल्या जवानांचे कवच बनले आहे.

बरोबर आजोबा! आदित्य म्हणाला. ‘एआय’ कधीही जवानांच्या धैर्याची जागा घेणार नाही. उलट त्यांचे प्राण वाचवण्यासाठी ‘एआय’ सतत सज्ज असते. त्यामुळे आपल्या सैनिकांचे धैर्य आणि ‘एआय’चे तंत्रज्ञान मिळून शत्रूपक्षावर विजय मिळवत असल्याचेही आदित्यने सांगितले

त्यावर जयंतरावांनी अभिमानाने मान डोलावली. असे म्हणतात की, देशासाठी प्राण देणे एक पवित्र काम, पण तंत्रज्ञान देऊन आपल्या सैनिकांचे प्राण वाचवणे हे कधी कधी त्याहीपेक्षा मोठे असते. तू ‘एआय’द्वारे देशासाठी काही केले, तर आमचा कंठ गर्वाने भरून येईल.

डॉ. कुलदीप देशपांडे हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांना अॅनेलिटिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘एलिशियम सोल्युशन्स’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणार्या जागतिक स्तरावरील कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
९९२३४०२००१

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
अमेरिकन व्हिसा धोरणात बदल : भारतीयांसाठी संधी व अडथळे

अमेरिकन व्हिसा धोरणात बदल : भारतीयांसाठी संधी व अडथळे

परदेशात जाऊन घेतलेल्या शिक्षणाला, भारतीय जनमानसामध्ये एक वेगळेच महत्त्व मिळते. त्यामुळे, अनेक विद्यार्थी करिअरसाठी परदेशाची वाट धरतात, यामध्ये अमेरिकेचा मान सर्वात मोठा. तिकडे जाण्यासाठी इच्छूकांची गर्दी असते. आजवर अमेरिकाही या विद्यार्थ्यांसाठी रेड कार्पेट घालत होती. मात्र, आता अमेरिकेने त्यांच्या व्हिसा धोरणात बदल करण्यास सुरुवात केल्याने, अमेरिकेत जाणे थोडे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कामाची उपलब्धता सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे बदलते व्हिसा धोरण आणि ..

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

प्रयागराज महाकुंभप्रमाणेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबतच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, डीआरएम भुसावळ विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाला नियोजन आणि अंमलबजावणीच्या स्थितीची माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121