
चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, या छळाविरुद्ध या लाखो निःशस्त्र ध्यानधारकांच्या समुदायाने त्यांच्या सत्य, करुणा आणि सहनशीलता या वैश्विक मूल्यांवरील श्रद्धेसह शांततापूर्ण मार्गाने प्रतिकार करत गेल्या २६ वर्षांत एक उल्लेखनीय मार्ग तयार केला आहे. या क्रूर कम्युनिस्ट हल्ल्यात जेव्हा सत्य आणि न्याय दडपले गेले, तेव्हा, फालुन गोंग साधकांनी संरक्षणार्थ प्रसंगी आपले आपले रक्त-मांसदेखील अर्पण केले. दुर्दैवाने दि. २० जुलै १९९९ पासून सुरू झालेला हा छळ आजपर्यंत चालू आहे. जगभरातील फालुन गोंग साधक या दिवसाला ‘निषेध दिवस’ म्हणून मानतात आणि शांततापूर्ण निदर्शने, रॅली आणि मेणबत्ती मोर्चांद्वारे चीनमध्ये चालू असलेल्या क्रूर छळाबद्दल लोकांना जागरूक करतात. त्याविषयी सविस्तर...दृढ श्रद्धा‘फालुन गोंग’ ज्याला ‘फालुन दाफा’ म्हणूनही ओळखले जाते, त्याचे संस्थापक ली होंगजी यांनी दि. १३ मे १९९२ रोजी चीनमध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत ही साधना पोहोचवली. सत्य, करुणा आणि सहनशीलता या तत्त्वांवर आधारित या ध्यान अभ्यासामुळे अत्यंत कमी वेळात मानसिक, तसेच शारीरिक स्वास्थ्यावर आश्चर्यकारक परिवर्तन जाणवल्याने हा साधना अभ्यास अत्यंत लोकप्रिय झाला. ‘फालुन गोंग’ने चिनी लोकांची दृढ आध्यात्मिकता आणि कम्युनिस्ट राजवटीत गमावलेल्या पारंपरिक मूल्यांची तळमळ जागृत केली. सरकारी अंदाजानुसार, ‘फालुन गोंग’ अभ्यासकांची संख्या ७० ते १०० दशलक्ष होती.
एका वरिष्ठ चिनी अधिकार्याने केलेल्या तपासणीत असे निष्कर्ष काढले की, ‘फालुन गोंग’मुळे संपूर्ण देशाला आणि जनतेला असंख्य फायदे झाले आहेत आणि यामुळे कोणतेही नुकसान नाही. असे असतानाही, ‘फालुन गोंग’चा समाजावर वाढता प्रभाव जिआंगच्या महत्त्वाकांक्षी राजकीय वाटचालीत अडथळा बनला. या चळवळीच्या लोकप्रियतेमुळे राजकीय सत्तेला धोका वाटल्याने, जिआंगने कम्युनिस्ट पक्षाच्या नास्तिक विचारसरणीला धोका म्हणून ही प्रथाच नष्ट करण्याची मोहीम सुरू केली. ‘सीसीपी’ने प्रभावीपणे सत्य, करुणा आणि सहनशीलतेवर विश्वास ठेवणार्या या वर्गातील लाखो लोकांविरुद्ध युद्ध घोषित केले. त्यानंतरच्या दोन दशकांत, ‘फालुन गोंग’चा छळ इतिहासातील मानवतेविरुद्धच्या सर्वांत गंभीर गुन्ह्यांपैकी एक ठरला आहे.
नरसंहाराची धोरणे
‘फालुन गोंग’विरोधी मोहिमेत, जिआंगने राष्ट्रव्यापी शाखांद्वारे कायदेबाह्य पक्षीय संघटना स्थापन करण्याचे थेट आदेश दिले. दि. १० जून १९९९ला स्थापन झाल्याने ‘६१० कार्यालय’ म्हणून ओळखले जाणारे हे कार्यालय, त्याची रचना आणि कार्ये ही थेट नाझी जर्मनीतील कुप्रसिद्ध ‘गेस्टापो’च्या रचनेसारखीच होती.
जिआंगने घोषणा केली की, तो तीन महिन्यांत ‘फालुन गोंग’ अभ्यासकांच्या प्रतिष्ठेला लक्ष्य करून त्यांची संपत्ती जप्त करून आणि त्यांच्यावर शारीरिक हल्ला करून ‘फालुन गोंग’चा नायनाट करेल. छळाच्या परिणामी ठार झालेल्या अभ्यासकांना आत्महत्येचे बळी घोषित करून त्वरित ओळख न करता अंत्यसंस्कार केले जात होते. चिनी राजवटीने ‘फालुन गोंग’चा नाश करण्याच्या प्रयत्नांत न्यायालये, प्रचार विभाग, सांस्कृतिक आणि राजकीय संस्था आणि शाळांसह सर्व उपलब्ध संसाधने एकत्रित केली.
राज्यांमधील माध्यमे वृत्तवाहिन्या, रेडिओ, वर्तमानपत्रे आणि नंतर इंटरनेट सर्व स्तरावर ‘सीसीपी’ला ‘फालुन गोंग’ची बदनामी करणार्या बनावट बातम्या तयार करण्याची सक्ती करण्यात आली. ‘फालुन गोंगच्या अभ्यासामुळे १ हजार, ४०० मृत्यू’ , ‘तिआनमेन चौकात ‘फालुन गोंग’ अभ्यासकांचा स्वयंदाह’ आणि ‘फालुन गोंग हा चीनविरोधी शक्तीद्वारे पक्षाला धोका आहे,’ असे खोटे दावेदेखील ‘सीसीपी’द्वारे करण्यात आले.
जिआंगच्या नेतृत्वाखालील चिनी राजवटीने ‘फालुन गोंग’ अभ्यासकांवर अत्यंत हिंसाचार, सतत अपप्रचार आणि अमानवीय ब्रेन वॉशसारख्या डावपेचांचा उपयोग केला. या छळाच्या काळात, ‘फालुन गोंग’वर आपली श्रद्धा सोडण्यास नकार दिल्याबद्दल लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले. लेबर कॅम्प, नजरबंदी केंद्रे, पुनर्वसन केंद्रे आणि अनधिकृत तुरुंगातदेखील डामण्यात आले. मानवी हक्क गटांनी चिनी अधिकार्यांनी ‘फालुन गोंग’चा छळ करण्यासाठी वापरत असलेल्या १००हून अधिक छळाच्या पद्धती तसेच विषारी, मज्जातंतू-हानिकारक पदार्थांचा वापर केला असल्याचे उघड केले. या अत्याचारामुळे अनेक अभ्यासकांचा मृत्यू झाला. त्यांना अपंग करण्यात आले. चीनमधून माहिती प्रसारित करण्यात अडचण असल्याने या छळामुळे होणार्या मृत्यूंची संख्या अंदाजे काढणे कठीण आहे. अमेरिकास्थित संकेतस्थळ चळपसर्हीळ.ेीसने ‘फालुन गोंग’वरील श्रद्धा सोडण्यास नकार दिल्याबद्दल चिनी अधिकार्यांच्या हातून ४ हजार, ३२२ लोकांचे मृत्यू झाले असल्याचे प्रसिद्ध केले आणि ही अपूर्ण आकडेवारी त्रासदायक वास्तवाचा फक्त एक छोटा तुकडा आहे. कारण, अनेक मृत्यू अहवाल दिले गेले नाहीत किंवा बळींची हत्या अत्यंत गुप्ततेच्या परिस्थितीत केली गेली. हे सर्व एक भयानक वास्तव आहे.
शारीरिक आणि मानसिक छळाशिवाय, ‘फालुन गोंग’ अनुयायांना त्यांच्या नोकर्यांमधून काढले गेले, शाळा किंवा महाविद्यालयांतून बाहेर काढले गेले किंवा पेन्शन आणि इतर कल्याणकारी फायदे यांपासून वंचित केले गेले. अभ्यासकांच्या नातेवाईकांनीही मोठा त्रास सहन केला. दडपशाहीमुळे असंख्य कुटुंबे तुटली. चिनी मानवी हक्क वकिलांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला ‘फालुन गोंग’चा छळ जगातील सर्वांत गंभीर मानवी हक्क उल्लंघन म्हणून ओळखण्याचे आवाहन केले. खरं तर याची व्याप्ती आणि दुष्टता एखाद्या युद्धापेक्षादेखील कितीतरी जास्त आहे.
सक्तीचे अवयव प्रत्यारोपणजगभरातील अनेक अहवाल आणि अभ्यास दर्शवितात की, ‘सीसीपी’ ‘फालुन गोंग’ अभ्यासकांच्या हत्येबरोबरच एका अत्यंत अमानवी कृत्यात सहभागी आहे आणि ते म्हणजे सक्तीचे अवयव प्रत्यारोपण. १९९९ पासून वार्षिक आधारावर चिनी अवयव प्रत्यारोपणाच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. चिनी रुग्णालयातील अनेक डॉटरांनी संभाव्य प्रत्यारोपण पर्यटक म्हणून येणार्या अन्वेषकांकडे कबूल केले आहे की, ते पुरवत असलेले अवयव फालुन गोंग अभ्यासकांचे आहेत.
दि. २२ जून २०१६ रोजी अन्वेषक डेव्हिड किल्गोर, डेव्हिड माटास आणि इथन गुटमन यांनी संयुक्तपणे चीनमधील सक्तीच्या अवयव प्रत्यारोपणावर ७०० पानांचा अहवाल प्रकाशित केला. त्यांनी अंदाज व्यक्त केला की, चिनी रुग्णालयांनी प्रतिवर्षी ६० हजार ते एक लाख प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आणि दात्यांचा मुख्य स्रोत ‘फालुन गोंग’ अभ्यासक होते.
दि. १२ डिसेंबर २०१३ रोजी युरोपियन संसदेने चिनी अधिकार्यांना सक्तीचे अवयव प्रत्यारोपण बंद करण्याची आणि ‘फालुन गोंग’ अभ्यासकांना त्वरित लेबर कॅम्पमधून सोडण्याची मागणी करणारा तातडीचा ठराव मंजूर केला. दि. १९ मे २०१६ रोजी ’थजखझऋॠ’ने एक सर्वसमावेशक अहवाल प्रकाशित केला, ज्यामध्ये फोन रेकॉर्डिंग तसेच इतर पुरावे प्रदान केले गेले की, शासनाच्या समर्थनानेच हे अवयव प्रत्यारोपण होत आहे. दि. १३ जून २०१६ रोजी ‘युएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ने चीनमधील सक्तीच्या अवयव प्रत्यारोपण प्रथेचा निषेध करण्यासाठी ‘हाऊस रिझोल्यूशन ३४३’ मंजूर केले.
आर्थिक विध्वंसगेल्या दोन दशकांत निष्पाप ‘फालुन गोंग’ अभ्यासकांच्या छळाने प्रचंड आर्थिक, मानवी आणि सामाजिक संसाधने खर्च केली आहेत, तर चीनच्या शासनाला अमाप संपत्ती खर्च करावी लागली आहे. ’थजखझऋॠ’च्या तपासणीनुसार, चीनने छळाच्या शिखर वर्षात ‘फालुन गोंग’चे दडपण करण्यासाठी त्याच्या वार्षिक महसुलाच्या सरासरी जवळजवळ एक चतुर्थांश खर्च केला. दुसर्या स्रोताने सूचित केले की ‘सीसीपी’ने ‘फालुन गोंग’चा छळ चालू ठेवण्यासाठी चीनच्या जीडीपीच्या तीन चतुर्थांशाच्या बरोबरीची संसाधने एकत्रित केली. चीनच्या वित्त मंत्रालयाच्या एका अधिकार्याने कबूल केले की, ‘फालुन गोंग’ दडपण्याची धोरणे मोठ्या प्रमाणावर निधी देऊन टिकवून ठेवली गेली. या पैशाशिवाय दडपशाही टिकवून ठेवणे अशय होते.
जिआंग गटाने छळ चालविण्यासाठी लाखो कर्मचारी एकत्रित केले. या गटाला दिलेले पगार, बोनस वेतन, ओव्हरटाईम वेतन आणि इतर फायदे वार्षिक १०० अब्ज युआन खर्चापेक्षाही जास्त होते. ‘फालुन गोंग’च्या दडपणाशी संबंधित इतर खर्चाच्या उदाहरणांमध्ये सामान्य नागरिकांना अधिकार्यांकडे अभ्यासकांची तक्रार करण्यासाठी आर्थिक बक्षिसे देणे, ‘फालुन गोंग’ची बदनामी करण्यासाठी परदेशी चिनी भाषेतील मीडिया खरेदी करणे आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर चीनच्या मानवी हक्क रेकॉर्डचे समर्थन करण्याच्या बदल्यात विकसनशील देशांना परदेशी मदत देणे समाविष्ट आहे.
कायद्याचा गैरवापरविश्वासाचे स्वातंत्र्य याची चिनी राज्यघटनेने हमी दिली आहे आणि ‘फालुन गोंग’वर बंदी घालणारा कोणताही कायदा नाही. तरीदेखील ‘फालुन गोंग’ पुस्तकाची प्रत बाळगणे, इंटरनेटवरून ‘फालुन गोंग’ संबंधी सामग्री डाऊनलोड करणे, ‘फालुन गोंग’चे ध्यान, व्यायाम करणे किंवा इतरांशी या ध्यान अभ्यासाबद्दल बोलणे, या सर्वांसाठीही चीनमध्ये आजही गंभीर शिक्षेचा धोका आहे.
दि. ३० ऑटोबर १९९९ रोजी जिआंगने घाईघाईने ‘नॅशनल पीपल्स काँग्रेस’च्या स्थायी समितीला ‘फालुन गोंग’वर म्हणून दुष्ट पंथावर बंदी घालणारा कायदा मंजूर करण्याचे आदेश दिले आणि त्याच्या या छळाला वैधतेचे स्वरूप मिळवले. चिनी मानवी हक्क वकील ‘फालुन गोंग’विरोधी वा मोहिमेला बेकायदेशीर मानतात. कारण, ती चिनी राज्यघटनेचे उल्लंघन करते. ‘फालुन गोंग’ अभ्यासकांना शिक्षा देण्यासाठी फौजदारी कायद्यातील ‘अनुच्छेद ३००’चा वापर हा कायद्याचा गैरवापर आहे. जिआंगच्या आदेशानुसार स्थापन केलेले ‘६१० कार्यालय’ ही संघटना होती. कायदेशीर मर्यादांच्या बाहेर कार्यरत होती.
शांततापूर्ण प्रतिकाराचे महत्त्वगेल्या दोन दशकांत, चीनमधील आणि आणि जगभरातील ‘फालुन गोंग’ अभ्यासकांनी ‘सीसीपी’च्या छळाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या निषेधासाठी प्रत्येक शांततामय मार्गाचा वापर केला आहे. छळाची तीव्रता असूनही, लाखो ‘फालुन गोंग’ अभ्यासक अजूनही चीनमध्ये सक्रिय आहेत. या अविचल प्रयत्नांनी इतरांनादेखील कम्युनिस्ट पक्षाच्या अत्याचारांचा सामना करत त्यांच्या हक्कांसाठी आणि श्रद्धांसाठी उभे राहण्यासाठी प्रेरणा दिली आहे. दरम्यान, ‘सीसीपी’चे खरे स्वरूप उघड करताना, ‘फालुन गोंग’ अभ्यासकांनी जगाला ‘सीसीपी’चे शांततेने निर्मूलन करण्याचा आणि मानवी विवेक आणि नैतिकतेसाठी निःस्वार्थ आणि चिरकाल योगदान देत, परंपरा आणि धार्मिकतेच्या संस्कृतीकडे परतण्याचा मार्ग दाखवला आहे.
अलीकडे अमेरिका, कॅनडा, युरोपियन युनियन आणि तैवान यांसह जगभरातील सरकारे आणि अधिकार्यांनी धार्मिक स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याबद्दल ‘सीसीपी’चा सार्वजनिक निषेध केला आहे. त्यांनी छळ आणि अवयव प्रत्यारोपण तत्काळ थांबवण्यासाठी आणि सध्या नजरकैदेत असलेल्या सर्व ‘फालुन गोंग’ अभ्यासकांना मुक्त करण्यासाठी आग्रह धरला आहे.
भारताची भूमिका आश्वासक राहीलभारत आणि चीन यांच्यातील संबंध काही काळापासून तणावपूर्ण आहेत. भारतावर दबाव आणण्यासाठी, चीन अरुणाचल प्रदेश मुद्दा, लडाख सीमा संघर्ष, पाकिस्तानला समर्थन इत्यादी मुद्द्यांचा वापर करीत आहे. सीमा मुद्द्यावर भारताच्या कठोर भूमिकेनंतर आणि चिनी वस्तूंच्या बहिष्कारामुळे चीनला भारताच्या सामर्थ्याची जाणीव झाली आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा आणि धोरणे भारतासारख्या प्राचीन संस्कृती आणि आधुनिक लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणार्या सर्व गोष्टींच्या विरोधात आहेत. भारताने चीनमधील तिबेटी बौद्ध, उघूर मुस्लीम, ख्रिश्चन समुदाय आणि ‘फालुन गोंग’च्या मानवी हक्क उल्लंघनाचा निषेध करण्यात पुढाकार घेतला पाहिजे. हा विचार आणि भूमिका भारताला जागतिक नेत्याचा दर्जा प्राप्त करून देईल.
आनंद पोफळे
(वरील लेखातील काही संदर्भ ‘एपॉक टाईम्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखातून घेतले आहेत.)