एजेस फेडरल लाइफ इन्श्युरन्सने युलिप पोर्टफोलियोमध्ये सादर केला मल्टिकॅप फंड

ग्राहकांना दिली भांडवल वृद्धी परताव्याची संधी

    09-Feb-2024
Total Views |

Federal Cap   
 
 
 
एजेस फेडरल लाइफ इन्श्युरन्सने युलिप पोर्टफोलियोमध्ये सादर केला मल्टिकॅप फंड
 

ग्राहकांना दिली भांडवल वृद्धी परताव्याची संधी
 

मुंबई : भारतातील खासगी जीवन विमा कंपनी असलेल्या एजेस फेडरल लाइफ इन्श्युरन्सतर्फे (एएफएलआय) त्यांच्या युलिप (युनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन) पोर्टपोलियोचा भाग म्हणून मल्टिकॅप फंड सादर केला. विविध मार्केट कॅप्समध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या डायव्हर्सिफाइड पोर्टफोलियोमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करून परतावा मिळवून देण्याच्या दृष्टीने या ओपन एंडेड फंडाची रचना करण्यात आली आहे.
 
"विविध मार्केट कॅप्समध्ये डायव्हर्सिफाइड गुंतवणुकीच्या माध्यमातून भांडवल वृद्धी परताव्याचे लक्ष्य ठेवून आमच्या युलिप पोर्टफोलियोमध्ये करण्यात आलेली नवीन ॲडिशन सादर करताना आम्ही रोमांचित आहोत. मल्टिकॅप फंड सादर करत आमच्या इनोव्हेटिव्ह व मूल्याधारीत उपाययोजना उपलब्ध करण्याचा निर्धार पुन्हा एकदा दिसून आला आहे. डायव्हर्सिफिकेशन आणि जोखीम व्यवस्थापनाची खातरजमा करण्यासोबतच आमच्या ग्राहकांना आकर्षक परतावा देणे हे आमच्या युलिप पोर्टफोलियोमध्ये ही धोरणात्मक भर घालण्याचे उद्दिष्ट आहे.", असे एजेस फेडरल लाइफ इन्श्युरन्सचे एमडी व सीईओ विघ्नेश शहाणे म्हणाले.
 
"मल्टिकॅप फंड लाँच करणे हे एजेस फेडरल लाइफ इन्श्युरकडून आपल्या उत्पादनांचा दर्जा सातत्याने उंचावण्याचे आणि ग्राहकांच्या बदलणाऱ्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्याचे द्योतक आहे.", अशी पुष्टी शहाणे यांनी जोडली.
 
5 फेब्रुवारी 2024 रोजी मल्टिकॅप फंड खालील प्रोडक्ट्समध्ये समाविष्ट करण्यात येईल :
 
 
प्लॅटिनम वेल्थ बिल्डर
 
 
स्मार्ट ग्रोथ प्लॅन.
 
 
वेल्थश्युरन्स एसपी II
 
 
प्रस्थापित ब्लू-चिप कंपन्या, उदयोन्मुख ब्लू-चिप कंपन्या, मिड-कॅप कंपन्या आणि निवडक स्मॉल-कॅप कंपन्यांची काळजी सांगड घालून तयार केलेल्या फंडमध्ये गुंतवणूक करून ग्राहकांना त्यांच्या भांडवलात वृद्धी करण्यास मदत करण्यासाठी या मल्टिकॅप फंडची रचना करण्यात आली आहे. मध्यम ते दीर्घ कालावधीवर भर देत विविध क्षेत्रातील स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून जोखीम विभागण्याचे या फंडचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ग्राहकांना डायव्हर्सिफाइड आणि परताव्याची शक्यता निर्माण करणारे गुंतवणूक धोरण उपलब्ध होते.
 
 
मल्टिकॅप फंडचा महत्त्वाच्या तपशील खालीलप्रमाणे :
 
 
फंडचे नाव : मल्टिकॅप फंड
 
 
गुंतवणूक हेतू : सर्व मार्केट कॅप्समध्ये डायव्हर्सिफाइड पोर्टफोलियोच्या माध्यमातून भांडवलवृद्धी
 
 
गुंतवणुकीचा कालावधी : मध्यम ते दीर्घ
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121