शेअर बाजार झलक: सकाळच्या 'लो' ची संध्याकाळी भरपाई
मुंबई: आज अखेर क्लोजिंग बेलनंतर मात्र मार्केट पुन्हा सावरले आहे. अखेरच्या सत्रानंतर इक्विटी इंडायसेस सकारात्मक झाले आहेत. बीएससी सेन्सेक्स २७७.९८ पूर्णांकांने वाढत ७१८३३.१७ वर पोहोचला आहे. निफ्टी ५० हा ९६.,८० पूर्णांकांने वाढत २८४०.०५ वर पोहोचला आहे. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५०० पूर्णांकांने व निफ्टी १५० पूर्णांकांने घसरला होता.
लार्ज कॅप,स्मॉल कॅप स्टॉकस मध्ये वाढ झाल्यामुळे त्याचा फायदा शेअर बाजारात झाला. गुंतवणूकदारांना निर्देशांक वाढल्याने आज काहीसा दिलासा मिळाला आहे. गतवेळीप्रमाणे पीएसयु,ऑटो स्टॉकची कामगिरी समाधानकारक झाली असली तरी मात्र आयटी फार्मा शेअर्स घसरले आहेत.
बीपीसीएल, स्टेट बँक ऑफ इंडिया, ओएनजीसी कोल इंडिया, टाटा स्टील या शेअर्सच्या किंमतीत तेजी पहायला मिळाली. मात्र टेक महिंद्रा, सिपला, डॉ रेड्डी, इन्फोसिस, टीसीएसमध्ये घसरण पहावयास मिळाली आहे