मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग वन विभागाने रविवार दि. १ डिसेंबर रोजी कणकवली येथे विक्रीस आणलेल्या खवले मांजराला ताब्यात घेतले (pangolin seized from konkan). यावेळी या खवले मांजराची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली (pangolin seized from konkan). अटक केलेले आरोपी हे देवगडचे असून ते कणकवलीत खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आले होते (pangolin seized from konkan). यानिमित्ताने कोकणात अजूनही खवले मांजराची छुपी तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे. (pangolin seized from konkan)
कणकवली येथील वारगावमधील राजस्थानी ढाबा येथे खवले मांजराची तस्करी होणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी कणकवली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राजस्थानी ढाबा येथे सापळा लावला. याठिकाणी महिंद्री पिक अप गाडी आल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी या गाडीची तपासणी केली. त्यावेळी त्यांना गाडीत जिवंत खवले मांजर आढळून आले. या खवले मांजराची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या विशाल खाड्ये (लोरे, कणकवली), साहील गुरव (लोरे, कणकवली), संदीप खाडी (मुटाट, देवगड), गिरीधर घाडी (मुटाट, देवगड) आणि गुरुनाथ घाडी (मुटाट, देवगड) यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकणात आजही छुप्या पद्धतीने खवले मांजराची तस्करी होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
ही कारवाई संरक्षण आणि अतिक्रमण निर्मुलन वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन शिडतुरे, वनपाल महेश पाटील, सावळा कांबळे, सर्जेराव पाटील, धुळू कोळेकर, वनरक्षक प्रमोद जगताप, विष्णू नरळे, सचिन पाटील, सिध्दार्थ शिंदे, सुखदेव गळवे, ब्रम्हकुमार भोजने, कोमल करकुड, दिपाली पाटील यांनी केली.