दोडामार्गात दुर्मीळ संकटग्रस्त 'मलबार ट्री टोड' मंडूकाचे दर्शन

    17-Jun-2025
Total Views | 43
malabar tree toad
                                                                                                                                                    (छाया - मकरंद नाईक)
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात संकटग्रस्त असणाऱ्या मलबार ट्री टोड या मंडूकाचे दर्शन झाले आहे (malabar tree toad). दोडामार्गातील वन्यजीव निरीक्षकांना सोमवार दि. १६ जून रोजी रात्री या बेडकाचे दर्शन झाले (malabar tree toad). पश्चिम घाटातील या पावसाळी जीवाचा उत्तरेकडचा अधिवास हा दोडामार्ग तालुक्यात आहे. राज्यात मंडूकाची ही संकटग्रस्त प्रजात केवळ दोडामार्ग तालुक्यात आढळते. (malabar tree toad)
 
 
 
'आययुसीएन'ने संकटग्रस्त म्हणून नोंद केलेला मलबार ट्री टोड हा पश्चिम घाटाचा प्रदेशनिष्ठ मंडूक आहे. बेडूक आणि  मंडूक यांच्यातील महत्वाचा फरक म्हणजे बेडकांची त्वचा ओलसर व गुळगुळीत असते तर टोडची त्वचा कोरडी आणि लहान ग्रंथींमुळे खरखरीत असते. बेडकांचे मागचे पाय जाड व मांसल असतात, तर मंडूकाचे पाय बारीक हाडकुळे असतात. २०२२ साली या मंडूकाची महाराष्ट्रातून प्रथमच नोंद झाली. दोडामार्ग तालुक्यातील तिलारीच्या जंगलात त्याचा अधिवास आढळला. त्यानंतर तीन वर्षांनी हा मंडूक पुन्हा एकदा निदर्शनास आला आहे. दोडामार्गातील वन्यजीव निरीक्षक मकरंद नाईक, संजय सावंत, संजय नाटेकर आणि उदय सातर्डेकर हे सोमवारी रात्री वन्यजीव निरीक्षणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हा मंडूक दिसला.

१८७६ साली पहिल्यांदा या मंडूकाचा शोध गंथर या जिवशास्त्रज्ञाने लावला. त्यानंतर १०० वर्षांनी केरळमधील सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क येथे ही प्रजाती पुनःएकदा दिसून आली. भारतात सापडणाऱ्या इतर टोड प्रजाती जमिनीवरती, गवतामध्ये राहतात, तर मलबार ट्री टोड नावाप्रमाणे झुडुपांच्या फांद्यांवर किंवा वृक्षांच्या खोडावर अगदी जमिनीपासून १० मिटर उंचीवर आढळतो. सहयाद्रीच्या काही मोजक्याच भागांमध्ये समुद्रसपाटीपासून २५०ते १००० मीटरपर्यंत यांचा अधिवास आहे. हा बेडूक निशाचर असून पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातच तो नजरेस पडतो.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121