मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात अस्तित्त्वात राहिलेल्या सारस पक्ष्यांची संख्या ३४ असल्याची माहिती सारस गणनेनंतर समोर आली आहे (sarus bird census). वन विभाग आणि सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १६ जून रोजी या दोन्ही जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सारस गणना पार पडली (sarus bird census). गेल्या वर्षीची तुलनेत यंदा सारस पक्ष्यांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे. (sarus bird census)
महाराष्ट्रात वाघ-बिबट्यांप्रमाणे सारस पक्ष्यांचीही दरवर्षी गणना होते. 'सस्टेनिंग एनव्हायरमेंट अँड वाईल्डलाईफ असेंबलाज' (सेवा) या संस्थेकडून ही गणना केली जाते. ही संस्था २००४ पासून दरवर्षी या पक्ष्यांची गणना करत आहे. महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात संस्थेचे स्वंयसेवक हे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही गणना करतात. यंदा ही गणना १६ जून रोजी या जिल्ह्यांमध्ये पार पडली. या गणनेअंती महाराष्ट्रात केवळ ३४ सारस पक्ष्यांचे वास्तव्य असून मध्यपद्रेशातील बालाघाट जिल्ह्यात ४८ सारस पक्ष्यांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. राज्यात गोंदियामध्ये ३०, तर भंडारा जिल्ह्यात ४ सारस पक्षी असल्याची नोंद करण्यात आली आहे.
सोमवारी गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्ष्यांचा अधिवास असलेल्या ५३ ठिकाणी गणना पार पडली. या उपक्रमात गोंदिया वन विभागाचे अधिकारी कर्मचारी,सेवा संस्थेचे सदस्य, स्थानिक शेतकरी तसेच सारस मित्रस्वयंसेवक यांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्याच्या विविध भागांसाठी ३५ चमू बनविण्यात आले. या चमूंनी पहाटे ४.४५ ते ९ या वेळेत सारस पक्ष्यांच्या विश्रांतीच्या जागांवर प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण केले. प्रत्येक चमूमध्ये दोन ते चार स्वयंसेवक आणि वनविभागाचेकर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता. जवळपास १४० १५० सहभागी सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सेवा संस्थेचे, शशांक लाडेकर, अविजित परिहार, कन्हैया उदापुरे, डिलेश कुसराम, गौरव मटाले, भास्कर कापसे, लोकेश भोयर, चंदू बहेकार, प्रतिक बहेकार, रतिराम क्षीरसागर, राहुल भावे, परमेश्वर पारधी, जिगेश्वर लाडे, अनिरुद्ध तांडेकर, पिंटु वंजारी, दानवीर मस्करे, शेरबहादुर कटरे, शिव भोयर, श्री.रजत नागपुरे, अनिरुद्ध जामरे,हरगोविंद टेंभरे, सोमेश्वर कोल्हे, मिलिंद रामटेके, मनीष ढोमणे, निरज फाये, रीशील डहाके, मुकेश भगत, जैपाल ठाकूर, कमलेश कांमडे,प्रविण मेंढे, बबलू चुटे, कैलाश हेमने, मधु डोये, राकेश डोये, ओमप्रकाश नखाते, जितेंद्र देशमुख, गणेश बावनकर, फरहान सिद्दिकी, संजय डूभरे, ओमकार बहेकर, गौतम श्यामकुवर, संजय पारधी, किशोर उईके, सरगम सोनवाने, अरुण मिश्रा, निरज मिश्रा, अरुण मिश्रा, रिगल गजभिये, योगेश पाथोडे, हिरवळ संस्थेचे रुपेश निम्बातें, छत्रपाल चौधरी, दिपक परमार, छत्रपाल सहारे, पंकज नंदनवार, रोहित सोनवाने,रजत चतुर्वेदी, पियुष जैन, अरविंद गजभिये बीएनएचस चे मुकुंद धुर्वे यांचा सहभाग लाभला.
२०२४ मध्ये सारस पक्ष्यांची सहा घरटी गोंदिया जिल्ह्यात होती. पण मानवी हस्तक्षेप किंवा पर्यावरणीय बदलामुळे चार घरट्यांमधील अंडी खराब झाली होती.या पार्श्वभूमीवर, सारस पक्ष्यांचे विद्यमान अधिवास क्षेत्र तातडीने संरक्षित करणे, त्याचे पुनरुज्जीवन करणे आणि नव्या संरक्षण क्षेत्रांची योजना आखणे ही काळाची गरज आहे. केवळ निरीक्षण पुरेसे नसूनआहे. प्रभावी कार्यवाही, धोरणात्मक नियोजन व स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग यांचा समन्वय आवश्यक आहे. - सावन बहेकार, अध्यक्ष, सेवा