मध्य रेल्वेचा मालवाहतुकीच्या आलेख चढाच !

आर्थिक वर्षात ५१.७३ दशलक्ष टन मालवाहतुकीची नोंद

    11-Dec-2024
Total Views | 19

railway
मुंबई, दि.११ : मध्य रेल्वेने या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ५१.७३ दशलक्ष टन इतकी प्रभावी मालवाहतूक केली आहे, ज्यामध्ये नोव्हेंबर-२०२४ महिन्यातील ६.७२ दशलक्ष टन समाविष्ट आहे. मध्य रेल्वेच्या अन्नधान्य, साखर, कंटेनर आणि पेट्रोलियम उत्पादने यांसारख्या वस्तूंच्या लोडिंग क्षेत्रात कामगिरी सुधारली आहे, ज्यामुळे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढीव लोडिंग साध्य करता आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
दरम्यान, नोव्हेंबर २०२४ मध्ये दररोज एकूण ३४६ गाड्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३३४ गाड्यांची दररोज अदलाबदल करण्यात आली होती, यामध्ये ३.५९% ची वाढ नोंदवली गेली. तसेच मालगाड्यांचा सरासरी वेग १२.६ किमी प्रतितास वरून १४.६% पर्यंत वाढला, ज्यामध्ये १५% ची सुधारणा आहे. मध्य रेल्वे आपली कामगिरी सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि आपले यश अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत असते.
लोडींगचे तपशील
नोव्हेंबर-२०२४ मध्ये ८४ रेक्स अन्नधान्याचे लोड केले तर नोव्हेंबर-२०२३ मध्ये ३६ रेक होते, ज्यामध्ये १३३.३% ची प्रभावी वाढ आहे. नोव्हेंबर-२०२३ मधील ३१ रेकच्या तुलनेत नोव्हेंबर-२०२४ मध्ये साखरेचे ३८ रेक लोड करण्यात आले, ज्यामध्ये २२.६% ची वाढ झाली आहे.नोव्हेंबर-२०२४ मध्ये कंटेनरच्या ७७१ रेकची लोडिंग नोव्हेंबर-२०२३ मधील ७१८ रेकच्या तुलनेत, ७.४% ची वाढ नोंदवली गेली. नोव्हेंबर-२०२४ मध्ये पेट्रोलियम उत्पादनांचे १९४ रेक नोंदवले गेले, जे नोव्हेंबर-२०२३ मध्ये १८५ रेक होते, यामध्ये ४.७% ची वाढ नोंदवली गेली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121