राज्यातील शाळांसाठी नवीन वैद्यकीय आपत्कालीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

    04-Nov-2024
Total Views | 26


school
 
मुंबई : ( New Medical Guidelines )महाराष्ट्रातील सर्व शाळांनी आता वार्षिक आरोग्य तपासणी आणि कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन म्हणजेच सीपीआर सारख्या आपत्कालीन प्राथमिक उपचारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करणे, तसेच समुपदेशकांची नियुक्ती करण्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी ताणतणाव-निवारण कार्यशाळा सुरु करणे ही शाळांसाठी नव्याने जारी करण्यात आलेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या मार्गदर्शक तत्त्वांमधील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
 
शालेय वयात असणारी मुले त्यांच्या दिवसातील ६- ७ तास शाळांमध्ये घालवतात हे लक्षात घेऊन, या काळात उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीसाठी शाळांना सक्षम करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शाळांनी वेळेत प्रथमोपचाराची तयारी केल्यास कोणतीही अनुचित घटना टाळता येईल.
 
प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळेसह सहज उपलब्ध होणारे प्रथमोपचार किट, उपचार करण्याकरिता विशेष रुमची व्यवस्था आणि वार्षिक वैद्यकीय तपासणी यासारख्या काही मूलभूत बाबी समाविष्ट आहेत.
 
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात जारी केलेल्या सरकारी निर्णय (GR) मध्ये नमूद केले आहे की, “वैद्यकीय आणीबाणीशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळली जातात याची खात्री करण्यासाठी एक प्रशिक्षक असावा,” असे नमूद केले आहे.
 
ऑन-कॉल डॉक्टर सुविधेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी शाळांनी जवळच्या रुग्णालयांशी सामंजस्य करार केले पाहिजेत असे नमूद केले आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही सांगितले आहे की, कोणत्याही मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास शाळेत वाहनाची सुविधा असावी.
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या जुलै २०२४ पासूनच्या निर्देशांचे परिणाम आहेत, जेव्हा त्यांनी महाराष्ट्र सरकारला आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अवलंबल्या जाणाऱ्या प्रक्रियांबाबत सर्वसमावेशक सूचना जारी करण्याचे निर्देश दिले होते.
 
फेब्रुवारी, २०१६ मध्ये कांदिवलीतील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा वर्गात चक्कर येऊन बाकावर डोके आपटल्याने मृत्यू झाला होता. तिला व्हीलचेअरवरून सहाव्या मजल्यावरून खाली आणून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते, तेथे रक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला होता. त्या मुलीच्या आईने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला होता
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121