मुंबई : संस्कार भारती चित्रपट विधा तर्फे ‘सिनेटॉक – सिने सृष्टि भारतीय दृष्टी’ हा कार्यक्रम दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘मा स्टुडिओ, १९६ आराम नगर पार्ट २, वर्सोवा, अंधेरी पश्चिम’ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ‘द लास्ट टॉक’ या लघुपटाचे प्रदर्शन व त्यावर चर्चा केली जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
भारतीय प्रेक्षकांना विशेषत: तरुण वर्गाला दर्जेदार लघुपट आणि माहितीपट पाहता यावेत आणि त्या माहितीपटातून किंवा लघुपटातून चांगले संस्कार त्यांच्यावर घडावेत या उद्देशाने संस्कार भारती चित्रपट विधा दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ‘सिनेटॉक – सिने सृष्टि भारतीय दृष्टी’ या कार्यक्रमाचे आयोजन करते. दर महिन्यात एका वेगळ्या विषयावर आधारित माहितीपट किंवा लघुपट या कार्यक्रमात दाखवला जातो आणि त्यावर चर्चा केली जाते.