मुंबई, दि.१९ : प्रतिनिधी महाराष्ट्रात आज दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया आरामात आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रेल्वे, मेट्रो १, मेट्रो ३ आणि मेट्रो २ए आणि ७ तसेच, बीएसटीनेही त्यांच्या सेवा पहाटे ४ ते दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १ वाजेपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मेट्रो 1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) ने त्याच्या संचलनात विशेष सेवाचा समावेश केला आहे. वर्सोवा आणि घाटकोपर येथून पहिली मेट्रो पहाटे ४:०० वाजता सुटेल, तर दोन्ही स्थानकांवरून शेवटची सेवा २१ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत चालविण्यात येणार आहे. याशिवाय, मेट्रो ३ची सेवा पहाटे ४ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरु असेल. मेट्रो २अ (दहिसर पश्चिम - डीएन नगर) आणि ७ (गुंदवली - दहिसर पूर्व)चे वेळापत्रक देखील बदलले आहे. गुंदवली, डीएन नगर आणि अंधेरी पश्चिम येथून पहिली मेट्रो पहाटे ४ वाजता सुटेल, तर या स्थानकांवरून शेवटची सेवा २१ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजता धावेल.
मध्य रेल्वे १२ विशेष लोकल चालवणार
निवडणूक कर्मचारी आणि जनतेच्या हालचाली सुलभ करण्यासाठी मध्य रेल्वे १९-२० नोव्हेंबर (मंगळवार-बुधवार रात्री) आणि २०-२१ नोव्हेंबर (बुधवार-गुरुवार रात्री) विशेष उपनगरीय रेल्वे सेवा चालवणार आहे. या गाड्या मुख्य मार्गावर (सीएसएमटी-कल्याण) आणि हार्बर मार्गावर (सीएसएमटी-पनवेल) धावतील.
_________
मेट्रो १ (वर्सोवा-घाटकोपर) - पहाटे ४ ते मध्यरात्री १
मेट्रो 3 (आरे - बीकेसी) - सकाळी ४ ते मध्यरात्री १
मेट्रो 2A आणि 7 - पहाटे ४ ते मध्यरात्री १
बेस्ट - पहाटे ४ - मध्यरात्री १
मध्य रेल्वे (२०-२१ नोव्हेंबर, २०२४)
छशिमट-कल्याण आणि कल्याण- छशिमट: मध्यरात्री १:१० वाजता प्रस्थान
छशिमट- कल्याण आणि कल्याण -छशिमट: मध्यरात्री २:३० वाजता प्रस्थान
छशिमट-पनवेल: ०१:४० वाजता प्रस्थान
सीएसएमटी- पनवेल: ०२:५० वाजता प्रस्थान
पनवेल- छशिमट: ०१:०० वाजता प्रस्थान
पनवेल- छशिमट: ०२:३० वाजता प्रस्थान
पश्चिम रेल्वे
चर्चगेटहून पहिली लोकल: ०४:१५ वाजता सुटते
विरारहून पहिली लोकल : ०३:२५ वाजता सुटते
शेवटची लोकल चर्चगेटहून ०१:०० वाजता सुटते.
विरारहून शेवटची लोकल : ००:०५ वाजता सुटते