
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
कोंढव्यातील एका उच्च्भ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केला. आरोपीने स्वतःची ओळख कुरिअर बॉय असल्याची सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने महिलेला बँकेचे कुरिअर आहे असे सांगितलं, त्यानंतर जबरदस्तीने घरात शिरून तिच्यावरती बलात्कार केला तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते. तरुणी मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीत काम करते. दरम्यान आरोपीने सोसायटीमध्ये जाण्यासाठीन स्वतःला कुरिअर बॉय असल्याचे सांगितले होते. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेचे कुरिअर आहे असे सांगितलं होतं, मात्र तरूणीने ते आपलं नसल्याचं सांगितलं, पण त्याने त्यावर सही करावी लागेल असं सांगितल्याने तरूणीने सेफ्टी डोअर उघडला. आणि त्याचा फायदा नराधम आरोपीने घेतला. आरोपीने तरूणीच्या तोंडावरती केमिकल स्रे मारला, ज्यामुळेती बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. महिला शुद्धीत आल्यावर तिने पोलिसांना संपर्क केला.
घरात कोणी नसल्याचा घेतला फायदा -
महिलेचा भाऊ कामानिमित्त बाहेर गावी होता. त्यामुळे घरात कोणीच नव्हते. घरात कोणीच नाही हे बघून अज्ञात इसमाने फायदा घेतला. कुरिअर बॉय असल्याने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने जास्त चौकशी केली नाही. त्यामुळे आरोपीने सहज प्रवेश मिळवला.
सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रयत्न -
ही घटना नामांकित सोसायटीमध्ये घडली आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न निर्माण झाला आहे. कुरिअर, फूड डिलिव्हरी करणाऱ्या मुलांना सोसायटीमध्ये प्रवेश करण्यापासून कसे थांबवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
'महिलेच्या मोबाईल मध्ये काही फोटो मिळाले आहेत. त्या आधारे पोलिसांची १० पथके तयार केली आहेत. संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तपस सुरु केला आहे.' - पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे