मुंबई, दि.१५ : प्रतिनिधी मुंबईतील भूमिगत मेट्रो मार्गिका मेट्रो ३च्या वांद्रे कुर्ला मेट्रो स्थानकानजीक आग लागल्याची घटना घडली आहे. वांद्रे ते आरे कॉलनी हा पहिला टप्पा नुकताच सुरु करण्यात आला होता. प्रवाशांचा या मेट्रो मार्गिकेला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच दि.१५ रोजी दुपारच्या सुमारास बीकेसीमधील मेट्रो स्थानकाबाहेर आग लागली आहे. यामुळे आगीमुळे सर्वत्र धुळाचे लोळ उठल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळासाठी ही मेट्रो सेवा थांबवण्यात आली आहे. २.४५ वाजता अग्निशमन विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये एका मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. या परिसरात आज दुपारी १ वाजून ०९ मिनिटांच्या सुमारास आग लागली. ही आग लेव्हल २ची आहे. या भूमिगत मेट्रो स्थानकातील तळघरात ठेवलेले लाकडी साहित्य आणि फर्निचर यांना ही आग लागली. तळघरात सुमारे ४० ते ५० फूट खोल ही आग लागली, यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानकात धुराचे लोळ पसरले. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वांद्र्यात सध्या घटनास्थळी अग्निशमक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम कार्यरत आहे. सर्व प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता, बांधकामाधीन असलेल्या बीकेसी मेट्रो स्टेशनच्या A4 एंट्री/एक्झिट जवळ आगीची घटना घडली. त्यामुळे स्टेशन परिसराच्या ऑपरेशनल भागात धुराचे लोट पसरले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून बीकेसी स्थानकावरील कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले. उर्वरित विभागात मेट्रो सेवा; आरेजेव्हीएलआर-वांद्रे कॉलनी सामान्य कामकाजात होती. मुंबई अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, आणि एमएमआरसी आणिडीएमआरसीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग पूर्णपणे विझली आणि २.४५ वाजता अग्निशमन विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आली. आमच्या अमूल्य प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल खेद वाटतो.