‘बम्बई मेरी जान’ मधून मुंबईचे गुन्हेगारी विश्व पुन्हा उलगडणार

    05-Sep-2023
Total Views | 30
 
amazon prime
 
मुंबई : मुंबईत ६०-७०च्या दशकात गुन्हेगारीचा विळखा फार मोठा होता. त्या काळातील गुन्हेगारी विश्व आजवर अनेक चित्रपट आणि वेब मालिकांमधून दाखवण्यात आले. पुन्हा एकदा त्या विश्वाचा वेगळा पैलु मांडणारी ‘बम्बई मेरी जान’ ही वेब मालिका लवकरच Amazon prime या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. सुजात सौदागर यांचे दिग्दर्शन असेलल्या या वेब मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून यात गुन्हेगारी विश्वातील थरारक मुंबईची गोष्ट पाहायला मिळत आहे.
 
‘बम्बई मेरी जान’ या वेब मालिकेचे कथानक इमानदार पोलीस अधिकारी आणि त्यांच्या मुलाची गोष्ट गुन्हेगारी जगताशी कशी जोडली जाते यावर आधारित आहे. एकीकडे पोलिसाचा मुलगा कुख्यात गुंड होतो तर दुसकीरडे इस्माइल कादरी हा पोलीस अधिकारी मुंबईतील गुन्हेगारीला आळा घालण्याचा कसा प्रयत्न करत असतो या दोन्ही गोष्टी वेब मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न केला आहेमुंबईतील गुन्हेगारी विश्वासह एका बापलेकाच्या नात्याची अनोखी गोष्ट देखील यात पाहायला मिळणार आहे.
 
 
 
‘बम्बई मेरी जान’ मध्ये अभिनेता के के मेनन मुख्य भूमिकेत असून अविनाश तिवारी त्याच्या मुलाच्या भूमिकेत आहे. तसेच, कृतिका कामरा, निवेदिता भट्टाचार्य, अमायरा दस्तूर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिनेता फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटने या वेब मालिकेची निर्मिती केली असून Amazon Prime वर ही वेब मालिका १४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121