एस्सार ऑईल अँड गॅसला रेकोर्डब्रेक नफा

    31-Jul-2023
Total Views |
 
Essar
 
 
 
एस्सार ऑईल अँड गॅसला रेकोर्डब्रेक नफा
 
नवी दिल्ली :  एस्सार ऑईल अँड गॅस एक्सप्लोरेशन अँड प्रॉडक्शन लिमिटेडने (ईओजीईपीएल)३१ मार्च अखेरीस ३३५ कोटी रुपयांचा भरघोस निव्वळ नफा कमावला आहे.मागील आर्थिक वर्षात २२-२३ मध्ये 212 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
ईओजीईपीएल सध्या भारतातील दोन तृतीयांश वायू उत्पादन कोळशाच्या सीमपासून तयार करते,ज्याला कोल बेड मिथेन (सीबीएम) म्हणतात.आणखी २०० विहिरी खोदण्यासाठी येत्या १८ ते २४ महिन्यांत दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे.त्यातून दररोज ०.८४ दशलक्ष स्टँडर्ड क्युबिक मीटर सीबीएमचे उत्पादन झाले.
 
भविष्यातील पाच वर्षांत भारताच्या एकूण गॅस उत्पादनात पाच टक्के योगदान देण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे.राणीगंज ब्लॉक हा सीबीएमचा आजवरचा सर्वाधिक उत्पादक आहे आणि आजपर्यंत ८२ अब्ज घनफूट सीबीएम गॅस चे उत्पादन करणारा भारतातील एकमेव सीबीएम प्रकल्प आहे.
 
ईओजीईपीएल सध्या पश्चिम बंगालमधील राणीगंज सीबीएम ब्लॉकमध्ये सुमारे 350 विहिरी चालवत आहे आणि अस्तित्वात असलेल्या विहिरींमधून गॅस उत्पादन वाढविण्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि उत्तेजन तंत्राच्या सहाय्याने विहीर पुनरुज्जीवनाचा दृष्टिकोन कंपनीने ठेवलेला आहे.यावेळी कंपनी राज्याच्या तिजोरीत दरवर्षी १५० कोटी रुपये भरत असून राणीगंजमधून सीबीएमचे उत्पादन वाढल्यानंतर ते ३०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे
 
येत्या काही काळात त्याचा सीबीएम राखीव आधार दुप्पट करण्यासाठी आणि ब्लॉकमधून उत्पादन 3 एमएमएससीएमडीपर्यंत वाढविण्याचे ओजीईपीएल चे उद्दिष्ट आहे.ही उद्दिष्टांची अंमलबजावणी साठी टप्प्याटप्प्याने कार्यक्रम राबविण्यासाठी कंपनीने जागतिक स्तरावरील सेवेदार आणि तांत्रिक सल्लागारांचा सल्ला कंपनीने घेतला आहे.
 
ईओजीईपीएलने तेल आणि वायू क्षेत्रातील डिजिटलायझेशन आणि रिमोट ऑपरेशन्ससाठी केली आहे,कार्यक्षमता वाढविणे आणि प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी सेन्सियाबरोबर कंपनीने भागीदारी केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121