सुशांत सिंग-दिशा सालियान मृत्युचे गुपीत उलगडणार; फडणवीसांचे संकेत!

    29-Jun-2023
Total Views | 64

Devendra Fadnavis 
 
 
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला होता. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी त्याची मॅनेजर दिशा सालियनचाही मृत्यू झाला होता. या घटनेला तीन झाली आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही प्रकरणांबाबत मोठा अपडेट शेअर केला आहे. एका मुलाखती दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणातील सीबीआयच्या तपासाबाबत विचारण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुराव्याची विश्वासार्हताही तपासली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पूर्वी उपलब्ध असलेली सर्व माहिती ऐकीव माहितीवर आधारित होती. मात्र, नंतर काही लोकांनी सांगितले की त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही ठोस पुरावे आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलून पुरावे पोलिसांकडे देण्यास सांगितले आहे. सध्या उपलब्ध असलेले सर्व पुरावे बरोबर आहेत की नाही ते तपासले जात आहे. तपास सुरू आहे, त्यामुळे त्याच्या निकालावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही." असं म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121