मुंबईतील वायुप्रदूषणाच्या तक्रारींमध्ये २३७ टक्क्यांनी वाढ

प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

    16-May-2023
Total Views | 59

air pollution
मुंबई : मुंबईमध्ये घन कचरा व्यवस्थापनेसंबंधी नागरिकांच्या तक्रारी १२४% नी वाढल्या आहेत. वायु प्रदूषणाच्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी २३७ % नी आणि मल : निसारणासंबंधी नागरिकांच्या तक्रारी ३५% नी वाढल्या असून सन २०२२ मध्ये या तक्रारी सोडवण्याचा सरासरी अधिकतम कालावधी ३१ दिवस असल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. प्रजा फाउंडेशनकडून मंगळवार दिनांक १६ मे रोजी सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण स्थितिदर्शक अहवालामध्ये (ईएसआर २०२१-२२) प्रति दिन ६३०० मेट्रिक टनाच्या ७३% ओला कचरा जमा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान मुंबई महानगरपालिका क्षेपणभूमीवर कचरा पाठविण्यासाठीचा वाहतूक खर्च कचरा व्यवस्थापन प्रक्रियेच्या विकेंद्रीकरणाद्वारे कमी करू शकते. विशेषत: महापालिकेच्या सर्व २४ विभागातून प्रति दिन १ मेट्रिक टन कचरा जमा करणे व क्षेपणभूमीवर पाठविण्यासाठीचा वाहतूक खर्च अंदाजे रु. ३८४० प्रति दिवस होतो. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका प्रति दिन ६३०० मेट्रिक टन कचरा वाहतूक करण्यासाठी रु. २.४२ कोटी प्रति दिन आणि रु. ८८३ कोटी वार्षिक खर्च करत असल्याचे प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी म्हटले आहे. तर कांजुरमार्ग क्षेपणभूमीचा प्रति दिन प्रचलन व देखभाल खर्च अंदाजे रु. ३००० प्रति १ मेट्रिक टन आहे. अशाप्रकारे प्रति दिन ५५०० मेट्रिक टन कचर्‍याचा वार्षिक खर्च रु. ६०२ कोटी होत असल्याचेही म्हस्के यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच प्रजा फाऊंडेशनचे संशोधन आणि विश्लेषण प्रमुख योगेश मिश्रा यांनी घन कचरा व्यवस्थापनेचे प्रभावी विकेंद्रीकरण ही काळाची गरज आहे. स्वच्छ भारत अभियानाचे विशेष उद्दीष्ट कचरा व्यवस्थापन आणि कचरा निर्मितीच्या ठिकाणी कचर्‍याची प्रकिया हे असल्याचे यावेळी स्पष्ट केले. तर प्रजा फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक रिनी चेरियन यांनी घन कचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार अधिकतम कचरा निर्माण करणार्‍या (बी डब्ल्यु जी) गृहनिर्माण संस्थांनी (प्रति दिन १०० कि.ग्र. हून अधिक कचरा निर्माण करणार्‍या संस्था) त्यांच्या कचर्‍यावर विशेषत: ओल्या कचर्‍यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणी प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121