शेतकऱ्यांसाठी मुबलक प्रमाणात बियाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12-May-2023
Total Views |
मुंबई : आज खरीप हंगामपूर्व बैठक पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या उपाययोजनांवर चर्चा झाली. ही बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आजची खरीप हंगामपूर्व बैठक पार पडली. घरगुती बियाणांसोबतच बियाणेबदलीसाठीदेखील मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले. त्याचप्रमाणे खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हावा यासाठीदेखील शासनपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, मागील वर्षीचा खतांचा साठा ८० टक्के उपलब्ध असल्याने कुठेही खतांचा तुटवडा पडणार नाही, अशी माहिती यावेळी दिली. यासोबतच अल निनोच्या प्रभावाने पाऊस कमी किंवा पावसास विलंब झाला तर तशी योजना सरकारकडून करण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना योग्य लाभ दिला जाईल. अन्य गावांनाही त्यात सामावून घेतले जाईल. बोगस बियाणांसदर्भात शासन पातळीवर योग्य अंमलबजावणी केली जाईल. एखाद्या शेतकऱ्यास बोगस बियाणे मिळाल्यास त्याला ते बियाणे बदलून दिले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीवेळी दिली.