दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरुन गडकरींना धमकी

पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

    18-Apr-2023
Total Views | 43
nitin-gadkari-threat-case-shakir-threatened-on-the-behest-of-terrorist-akbar-pasha
 
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरनं गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलीस अधिक चौकशी करणार आहेत.
 
धक्कादायक माहिती आली उजेडात

अकबर पाशा हा प्रतिबंधित पीएफआय संघटनेचा सदस्य असून नागपूर पोलीस बेळगाव कारागृहात बंद असलेल्या अकबर पाशा सह त्याच्या इतर दहशतवादी साथीदारांची चौकशी करणार आहेत. जयेश उर्फ शाकीर हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेसह लष्कर ए तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याचे पुरावे तपासात मिळाले असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.

खंडणीसाठी गडकरी यांना धमकावले

बेळगावच्या तुरुंगातून १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने फोन करत धमकी दिली होती. यावेळी पहिल्यांदा १०० कोटी तर दुसर्‍या वेळी १० कोटी रुपये खंडणी म्हणून मागण्यात आले. पैसे न दिल्यास गडकरींन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121