हिमालयातील भूकंपप्रवण क्षेत्रांचे मॅपिंग निसार उपग्रहाद्वारे होणार
इस्रो आणि नासाचा संयुक्त उपक्रम
17-Apr-2023
Total Views | 44
3
नवी दिल्ली : हिमालयातील भूकंपप्रवण क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) यांनी संयुक्तपणे विकसित केलेला ‘नासा-इस्रो सिंथेटिक ऍपर्चर रडार’ अर्थात ‘निसार’ हा उपग्रह लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे.
‘निसार’ उपग्रह प्रणाली भूस्खलनाचा इशारा देण्यासाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून काम करेल. शास्त्रज्ञ दर १२ दिवसांनील प्रणालीद्वारे संकलित केलेली माहिती वापरून भूगर्भातील विविध हालचालींचे विश्लेषण करणार आहेत. त्याविषयी बोलताना इस्रो-नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे संचालक प्रकाश चौहान म्हणाले की, हिमालयाच्या विविध भागांमध्ये तणाव कसा निर्माण होत आहे हे निर्धारित करण्यासाठी भूवैज्ञानिक समुदायास या माहितीचा वापर करू शकणार आहेत.
हिमालयातील सर्वाधिक भूकंप-प्रवण क्षेत्रांचा नकाशा ही प्रणाली तयार करून त्यामुळे संभावित भूस्खलनाचाविषयी आगाऊ इशारा देणे शक्य होणार आहे. या प्रणालीचा वापर हिमालयाच्या अशा अनेक भागांमध्ये उद्भवणाऱ्या तणावांबद्दल अधिक माहिती प्रदान करण्यासाठी होणार आहे. तसेच याद्वारे मिळालेल्या माहितीद्वारे हिमालयाच्या आतापर्यंत न दिसलेले अनेक पैलूदेखील उघड होण्यास मदत होणार आहे.
हा उपग्रह टेनिस कोर्टएवढ्या परिसरात ०.४ इंचांपेक्षाही लहान वस्तूंच्या हालचालीचे निरिक्षण करण्या, सक्षम आहे. अचूकतेमुळे ते ढगाळ वातावरण आणि अंधारातही काम करण्यास करण्यास सक्षम आहे. त्यामुळे हा उपग्रह कोणत्याही हवामानात दिवसा व रात्री कार्यरत राहणार आहे. हा उपग्रह तीन वर्षांच्या कालावधीसाठी काम करणार असून तो दर तीन दिवसांनी परिक्रमा करणार आहे.