सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास पाठिंबा नाही : नितेश राणे

    13-Dec-2023
Total Views | 33
 
nitesh rane
 
नागपूर : 'सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास आमचा पाठिंबा नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना त्याच्या जात प्रमाणपत्रावर मराठा असाच उल्लेख असायला हवा', असे स्पष्ट मत भाजप आमदार नितेश राणे यांनी मंगळवार, दि. ११ डिसेंबर रोजी विधानसभेत मांडले.
 
मराठा आरक्षण विषयक चर्चेत सहभागी होताना राणे म्हणाले, आरक्षणाच्या नावाखाली जर कोण घाणेरडे राजकारण करत असेल, तर ते आम्हाला मान्य नाही. मराठा आरक्षणासाठी राणे समिती, गायकवाड समितीसह असंख्य लोकांनी प्रयत्न केले आहेत. आम्ही राज्यभर फिरून मेळावे घेतलेले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुका केल्या नसत्या, तर आज ही स्थिती आलीच नसती.
उपोषण करत असणाऱ्या मराठा बांधवांना शांतता हवी आहे. तसे आवाहन नेहमी केले जात असताना दगड कोण मारतात? वातावरण कोण बिघडवितात? याची चौकशी झाली पाहिजे. ज्याला अटक झाली त्याच्या घरी रिव्हॉल्वर सापडले. जरांगे पाटील यांची समजूत काढली जाईल. परंतु, चुकीच्या मागणी मान्य करू नये. एक व्यक्ती म्हणजे मराठा समाज नाही, असेही राणे म्हणाले.
 
ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही
२७ टक्के असलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आम्हाला हात लावायचा नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील कलम १५(४) नुसार जे अधिकार दिलेले आहेत, त्याप्रमाणे एखाद्या समाजाचे मागासलेपण सिद्ध करून त्यांना आरक्षण देता येते. ते आरक्षण देण्यासाठी राणे समिती आणि गायकवाड समितीने प्रयत्न केले. आता शिंदे समिती प्रयत्न करत आहे. त्या पद्धतीने महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन मराठ्यांना स्वतंत्र आणि टिकणारे आरक्षण आमच्या सरकार देईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121