महादेव बेटिंग अ‍ॅपचा मालक रवी उप्पलला दुबईत अटक!

    13-Dec-2023
Total Views | 69
 
Mahadev Betting App
 
 
गांधीनगर : महादेव बेटिंग ॲपचा मालक रवी उप्पल याला दुबईतून अटक करण्यात आली आहे. रवी उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली आहे. रवी उप्पलसोबतच इतर दोन जणांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.
 
ईडीकडून या दोघांचा शोध सुरु होता. या दोघांच्या विरोधात ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याच नोटीसच्या आधारे दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पला अटक केली आहे. सौरव चंद्राकर हा आधी रायपूरमध्ये एक ज्यूस सेंटर चालवत होता. त्यानंतर तो सट्टेबाजीमध्ये सहभागी झाला.
 
 
सौरव आणि रवी यांच्याकडे सहा हजारांहून अधिक संपत्ती असण्याचा संशय आहे. हवालाच्या माध्यमातून रोकड दुबईला पाठवण्यात आली. तपास यंत्रणांना संशय आहे की दाऊद इब्राहिम टोळीने दुबईतून महादेव बुक अॅप इतक्या मोठ्या प्रमाणावर चालवण्यासाठी मदत केली असावी.
 
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महादेव ॲप प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. 2 नोव्हेंबरला ईडीला महत्वाची माहिती मिळाली होती. 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर 2023 ला छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुक झाल्या. यावेळी महादेव अॅपच्या प्रमोटरांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम छत्तीसगडमध्ये नेण्यात येत आहे, अशी माहिती ईडीला मिळाली. मग ईडीने हॉटेल ट्रायटन आणि अन्य ठिकाणी झडती घेतली. यावेळी 5 कोटी रूपये ईडीने जप्त केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भांडूप परिमंडलात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम

भांडूप परिमंडलात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम

महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ जून २०२५ रोजी रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे योजिले होते. त्याप्रमाणे, भांडूप परिमंडलातील ठाणे, वाशी व पेण मंडळातील प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी विद्युत सुरक्षा बाबत जनजागृती कार्यक्रम करण्यात आले व सदर कार्यक्रमाला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121