डी गुकेशचा ऐतिहासिक विजय! नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला चारली पराभवाची धूळ

    02-Jun-2025   
Total Views | 4

 D Gukesh achieved a stunning victory over Magnus Carlsen 
 
नवी दिल्ली : (Norway Chess 2025) नॉर्वेतील स्टाव्हांगर येथे सुरू असलेल्या नॉर्वे चेस २०२५ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय बुद्धिबळपटू डी. गुकेश याने माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला क्लासिकल फॉरमॅटमध्ये पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा गुकेशचा कार्लसनविरुद्ध क्लासिकल प्रकारातील पहिलाच विजय आहे.
 
सामना अत्यंत चुरशीचा ठरला. गुकेशने काळ्या मोहऱ्यांनी खेळ करत कार्लसनवर दबाव कायम राखला. कार्लसनने खेळाच्या उत्तरार्धात वेळेच्या दबावात चूक केली आणि त्याचाच फायदा घेत गुकेशने विजय निश्चित केला. या पराभवानंतर मॅग्नस कार्लसनने टेबलवर संतापाने हात आपटला आणि नंतर थेट खोलीतून बाहेर पडला. सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या या वागणुकीवर टीका केली आणि त्याला "सोर लूझर" म्हटले.
 
विजयानंतर गुकेशने प्रतिक्रिया देताना सांगितले, "९९ पैकी १०० वेळा मी हरलो असतो. आज फक्त नशीबाने साथ दिली." त्याच्या या नम्रतेचेही नेटिझन्सनी कौतुक केले आहे. गुकेशच्या आजोबांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "गुकेशचे अंतिम लक्ष्य जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणे हेच आहे." गुकेशचा हा विजय केवळ वैयक्तिक मैलाचा दगड ठरला नाही, तर भारतीय बुद्धिबळाच्या जागतिक यशाची नवी सुरुवात ठरली. त्याने मॅग्नस कार्लसनसारख्या मातब्बर खेळाडूला हरवून जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान बळकट केले आहे.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121