नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने मंगळवारी एकमेकांच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या याद्या सामायिक केल्या. पाकतर्फे भारतास २४६ भारतीयांची यादी सोपविली, ज्यामध्ये ५३ नागरिक आणि १९३ मच्छीमारांचा समावेश आहे.
रराष्ट्र कार्यालयाच्या निवेदनानुसार, २००८ च्या राजनैतिक सहाय्य करारानुसार, दोन्ही देशांना दरवर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी एकमेकांच्या तुरुंगातील कैद्यांच्या यादी शेअर करणे आवश्यक आहे. पाकिस्तानने भारतीय कैद्यांची यादी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीला सोपवली.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पाकिस्तान आणि भारताने राजनैतिक माध्यमांद्वारे एकमेकांच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या याद्या सामायिक केल्या. भारताने ४६३पाकिस्तानी कैद्यांची याजी सोपविली आहे. त्यामध्ये ३८२ नागरिक आणि ८१ मच्छीमारांचा समावेश आहे.