"इस्लाम स्वीकारा, सर्व आजार बरे होतील"; भुतबाधा झाल्याचे सांगत बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न

    25-Nov-2023
Total Views | 44

Maulavi


लखनौ :
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका मौलवीवर एका हिंदू महिलेला बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय पीडित महिलेच्या कुटुंबातील सदस्यांवर दबाव टाकून त्यांचेदेखील धर्मांतर केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नंदग्राम पोलीस स्टेशन परिसरातील असून मीनू असे पीडितेचे नाव आहे. पीडितेचा मुलगा अक्षय याने २४ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सरफराज असे आरोपी मौलवीचे नाव आहे.
 
२०१७ मध्ये पीडित मीनू ही शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे कंटाळली होती. यावेळी तिला कोणीतरी मौलवी सरफराजबद्दल सांगितले. त्यानंतर ती सरफराजकडे गेली असता सुरुवातीला त्याने तिला भुतबाधा झाली असल्याचे सांगत काही उपाय केले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
 
त्यानंतर जोपर्यंत ते हिंदू धर्मात राहतील तोपर्यंत त्यांच्या समस्या दूर होणार नाहीत, असे मौलवीने पीडित कुटुंबियांना सांगितले. एवढेच नाही तर मौलवी सरफराजने पीडित कुटुंबाला इस्लाम धर्म स्वीकारण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर अक्षय आणि त्याच्या कुटुंबीयांनी मौलवीवर विश्वास ठेवत घरातील सर्व देवी-देवतांचे फोटो काढून टाकले आणि इस्लामी पद्धतीने सर्व कामे करू लागले.
 
तसेच मौलवी सरफराज त्याच्याकडे येणाऱ्या इतर लोकांनाही त्यांचा धर्म सोडून इस्लाम स्वीकारण्यास सांगत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी मौलवीचा शोध सुरू केला. अखेर २४ नोव्हेंबरला गाझियाबादमधून सरफराजला अटक करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121