चीन-तैवान संघर्ष आणि भारताची भूमिका

    14-Oct-2023
Total Views | 72
Bharat Stand On China Taiwan Conflict

लढाईदरम्यान भारताकडे असलेली विविध साधने वापरून चिनी सैन्याबद्दल अचूक गुप्तहेर माहिती जर पुरवता आली, तर त्याचा तैवानला आणि अमेरिका आणि इतर मित्रराष्ट्रांना खूप फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने आपले सॅटेलाईट्स, टेहाळणी करणारी विमाने, ड्रोन्स आणि इतर साधनांचा वापर केला जावा.

ऊर्जा सुरक्षा व पुरवठा साखळी सुरक्षित करा

चीन-तैवान लढाई सुरू झाल्यावर भारताला आपल्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करावे लागेल. कारण, ही लढाई पुष्कळ दिवस चालू शकते. सर्वात प्रथम भारताची ऊर्जासुरक्षा, या काळातसुद्धा मजबूत राहिली पाहिजे. भारत ८५ टक्के तेल आयात करतो आणि देशांमध्ये युद्धकाळात तेलाच्या किमतीवर नियंत्रण राहिले पाहिजे. म्हणून लढाई सुरू व्हायच्या आधीच आपण जास्त तेलाचा साठा निर्माण केला पाहिजे व युद्धकाळात तेलाची आयात चालूच राहिली पाहिजे.

तेलाप्रमाणेच आपल्याला इतर आवश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीवर लक्ष द्यावे लागेल, विशेषकरुन अन्नसुरक्षा आणि आपल्या आयात आणि निर्यातीवर लक्ष ठेवून मार्ग सुरक्षित ठेवावे लागतील. हे काम कोस्ट गार्ड, नौदलाला करावे लागेल. याला ‘प्रोटेक्टिंग सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन’ (झडङजउ)असे म्हटले जाते.

‘युनायटेड नेशन्स जनरल असेम्बली’ आणि ‘युनायटेड नेशन्स सेक्युरिटी काऊंसिल’ची मीटिंग लगेच व्हायला पाहिजे आणि ज्यामध्ये युद्ध थांबवण्याकरिता ठराव पारित केला गेला पाहिजे. परंतु, जर युद्ध थांबले नाही, तर आपल्याला खालील कारवाई करता येईल-

- अमेरिका, द. कोरिया, जपान, फिलिपाईन्स, व्हिएतनामने आक्रमक कारवाई करावी.

- भारताची कुठलीही आक्रमक लष्करी कारवाई सुरू व्हायच्या आधी अमेरिका आणि त्यांचे मित्रदेश म्हणजेच द. कोरिया, जपान, दक्षिण पूर्व आशियामधील देश, फिलिपाईन्स, व्हिएतनाम यांनीसुद्धा आपल्या सीमेवरती आक्रमक कारवाई सुरू केली पाहिजे, ज्यामुळे त्या-त्या भागातील चिनी सैन्य हे तैवानच्या बाजूला लढाई करता जाऊ शकणार नाही.

अमेरिका आणि इतर मित्रराष्ट्रांना सगळ्या प्रकारची मदत म्हणजे इंधन पुरवणे, शस्त्रांची दुरुस्ती करणे, दारुगोळा पुरवणे अशा कारवाया केल्या जाऊ शकतात.

चिनी सैन्याबद्दल अचूक गुप्तहेर माहिती

लढाईदरम्यान भारताकडे असलेली विविध साधने वापरून चिनी सैन्याबद्दल अचूक गुप्तहेर माहिती जर पुरवता आली, तर त्याचा तैवानला आणि अमेरिका आणि इतर मित्रराष्ट्रांना खूप फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने आपले सॅटेलाईट्स, टेहाळणी करणारी विमाने, ड्रोन्स आणि इतर साधनांचा वापर केला जावा.

सायबर साधनांचा वापर करून चिनी कमांड कंट्रोल आणि त्यांच्या युद्ध पद्धतीची माहिती काढली जावी व ती तैवानला पुरवावी.
चिनी सैन्याच्या विरुद्ध मानसिक युद्ध सुरू करा

चीन आणि चिनी सैन्याच्या विरुद्ध मानसिक युद्ध सुरू करून चिनी सैनिक लढण्याकरिता कसे तयार नाहीत, या बातम्या चिनी सोशल मीडियावर पसरवल्या जाव्या, त्यामुळे त्यांचे मनोबल खच्ची होईल. दलाई लामा आणि भारतात असलेल्या तिबेटी नागरिकांचा पूर्ण वापर करून, हे मानसिक युद्ध लढले जावे.

भारतीय सैनिकी कारवाईचा मुख्य उद्देश असेल की, भारत-चीन सीमेवरती आणि तिबेटी पठारावर तैनात चिनी सैन्याला तिथून तैवानच्या सीमेवर जाता येऊ नये. यामुळे चीनला तैवानवरच्या हल्ल्यात सैन्य आणि दारुगोळा कमी पडेल.

दोन्ही ‘स्ट्राईक कोर’ची चिनी सीमेकडे हालचाल करा

भारताची चीन सीमा चार भागांमध्ये वाटली गेली आहे. पहिली लडाखला लागलेली सीमा, दुसरी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला लागलेली सीमा, तिसरी सिक्कीमला लागलेली सीमा आणि चौथी अरुणाचलला लागलेली सीमा. या सगळ्या सीमेवर चीनला आपले सैन्य तैनात ठेवायला लागले पाहिजे, ज्यामुळे तैवान सीमेवरती त्यांना चिनी सैन्याचे कॉन्सन्ट्रेशन करता येणार नाही.
भारताने चिनी सीमेवर आक्रमक कारवाई तयार करण्याकरिता दोन ‘स्ट्राईक कोर’ म्हणजे ‘आक्रमक कोर’ तयार केल्या आहेत. एक आहे मथुरास्थित ‘वन स्ट्राईक कोर’ आणि दुसरी आहे-पश्चिम बंगाल, दाणापूरस्थित ‘१७ कोर.’ या दोन्ही ‘स्ट्राईक कोर’ची चिनी सीमेकडे हालचाल सुरू करायला पाहिजे आणि त्यांनी सीमेवरती अशा ठिकाणी जाऊन पोहोचायला पाहिजे (श्रर्रीपलह रिवी) जिथून गरज पडली, तर लगेच चीनमध्ये आक्रमक कारवाई, या दोन्ही कोर करू शकतात. आक्रमक कारवाई करून आपण सिलिगुडी- चिकन नेक सुरक्षित करावी.

याशिवाय पाकिस्तान सीमेवर आपल्या अजून २१ आणि दोन ‘स्ट्राईक कोर’ तैनात आहेत. त्यांनासुद्धा चिनी सीमेच्या दिशेने वळवले पाहिजे.

पाकिस्तानी सीमेचे रक्षण तिथे तैनात असलेल्या होल्डिंग फॉर्मेशन करतील आणि गरज पडली तर अजून जास्त सैन्य आपण पाकिस्तानी सीमेकडून चिनी सीमेकडे वळवू शकतो.

युद्धाभ्यासाचे रुपांतर आक्रमक कारवाईमध्ये चीन सीमेवरती वेगवेगळ्या ठिकाणी आपण युद्धाभ्यास सुरू करू शकतो. गरज पडली तर युद्धाभ्यासाचे रुपांतर लगेच एका आक्रमक कारवाईमध्ये होऊ शकते.

हळूहळू लष्करी कारवाईची तीव्रता वाढवून आपण चीनला इशारा देऊ शकतो. विमाने, हेलिकॉप्टर्स, ड्रोन्सच्या आणि पायदळाच्या मदतीने सीमेवरती पेट्रोलिंग करणे/गस्त घालणे अशा कारवाया होऊ शकतात.

‘स्पेशल फ्रंटीयर फोर्स’ नावाचा तिबेटी सैनिक असलेला अतिशय उत्कृष्ट, असा फोर्स सैन्याकडे आहे, ज्याचा उपयोग तिबेटमधल्या तिबेटी नागरिकांना भारताच्या बाजूने वळवण्याकरिता केला जाऊ शकतो. युद्धात तिबेटी नागरिकांच्या मदतीने चिनी सैन्याची हालचाल लढाईदरम्यान पूर्णपणे थांबवली जाऊ शकते.

भारतीय हवाई दल, भारतीय नौदलाची आक्रमक तैनाती

भारतीय नौदलाची तैनातीसुद्धा आक्रमक व्हायला पाहिजे आणि नौदलाचा पश्चिमी कमांड हा अरेबियन समुद्रातून होणार्‍या तेलाच्या व्यापारावरती आणि चिनी व्यापारावरती लक्ष ठेवेल. विशाखापट्टणममधील ईस्टर्न कमांड आणि अंदमान आणि निकोबार आयलॅण्ड कमांड याचे लक्ष अर्थातच हिंदी महासागर खास करून मलाक्काच्या सामुद्रधुनीकडे असले पाहिजे. येथून चीनचा ६० ते ७० टक्के व्यापार जातो. गरज पडली तर हा व्यापार थांबवण्याची क्षमता आपल्याकडे आहे. परंतु, हे काम अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांकडून केले जावे.

भारतीय हवाई दलानेसुद्धा आपले लक्ष हे चिनी सीमेकडे आणि हिंदी महासागराकडे वळवले पाहिजे. जरुरी पडली तर आक्रमक कारवाई केली जाऊ शकते.

चीनने भारताकडून बळकावलेली सगळी जमीन परत घ्या!

बाकीच्या जगाला चीन विरोधात आक्रमक कारवाया करण्याकरिता भाग पाडले गेले पाहिजे. प्रत्यक्ष आक्रमक लढाई तिबेट सीमेच्या आत न्यायच्या आधी, भारताकडे असलेल्या इतर सगळ्या आक्रमक पर्यायांचा वापर करायला पाहिजे, ब्रह्मपुत्रा नदी ही अरुणाचल प्रदेशच्या सीमेला समांतर वाहत जाऊन भारतामध्ये ग्रेट बेंड या ठिकाणी प्रवेश करते. चिनी सैन्याची विमानतळे आणि कॅन्टोन्मेंट्स या भागात आहेत. अत्यंत आक्रमक कारवाई करायची म्हटली, तर तिथपर्यंत जाण्याची तयारी ठेवावी.

खरोखरच लढाई सुरू झाली, तर त्याचे रुपांतर महायुद्धात सुरू होऊ शकते. या संधीचा फायदा घेऊन चीनने भारताकडून बळकावलेली सगळी जमीन परत घेतली जावी.

युद्धात अमेरिकेने आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी जर भाग घेतला, तर चीनची अर्थव्यवस्था २०-२५ वर्षं मागे जाऊ शकते. म्हणजे चीनची अवस्था सध्या युक्रेन युद्धामध्ये जशी रशियाची झाली आहे, तशी केली जावी. आशा करूया की, अशा सगळ्या पर्यायांचे विश्लेषण करून नेमका कुठला पर्याय वापरायचा, त्याची योग्य निवड भारतीय सैन्य येणार्‍या काळामध्ये करेलच!

(नि.) ब्रि. हेमंत महाजन
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121