अमेरिकेची वाटचाल वेगाने यादवी युद्धाकडे?

    13-Jul-2025
Total Views |

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या देशाबाहेर आणि देशांतर्गत आव्हानांना तोंड देत आहेत. अमेरिकेमध्ये स्थलांतरितांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये ट्रम्प सरकारविरोधात हिंसक आंदोलन जोरावर आहे. हे आंदोलन पसरण्याची भीतीमुळे, अमेरिका यादवीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. अमेरिकेतील परिस्थितीचा घेतलेला आढावा...


अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये चाललेल्या घटना बघता, तेथील दोन राजकीय पक्षांच्या दोन भिन्न विचारधारेमुळे अमेरिकेची वाटचाल वेगाने यादवीकडे चालू झाल्याचे म्हटल्यास, वावगे ठरणार नाही. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष असून, ते रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये विरोधी पक्ष असणार्या डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आहे. परराष्ट्र धोरण, चलन, संरक्षण याची जबाबदारी अमेरिकेतील केंद्र सरकारची असते. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्कप्रमाणे सुमारे दहा राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या धोरणानुसार, अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांना नुसता आश्रयच नव्हे, तर संपूर्ण सुखसोयी पुरवल्या पाहिजेत. पण, या स्थलांतरितांना अमेरिकेत प्रवेश देताना त्या स्थलांतरितांचा अमेरिकेला काय उपयोग होईल याचा विचार न करता, त्यांना सरसकट प्रवेश देण्यामुळे हे स्थलांतरित अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरील बोजा बनले आहेत. फुकट राहणे, दुकानांमध्ये लुटालूट करणे, सार्वजनिक ठिकाणी सामान्य लोकांना त्रास देणे, परिसर घाण करणे, ही या स्थलांतरितांची वैशिष्ट्ये. या स्थलांतरितांनी अमेरिकेत सध्या धुमाकूळ घातला आहे. या अवैधपणे अमेरिकेत घुसलेल्या स्थलांतरितांना अमेरिकेबाहेर काढण्यासाठी, डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष प्रयत्नशील आहे.

त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व करणार्या राज्यांमध्ये, या स्थलांतरितांना शोधून अमेरिकेबाहेर हाकलण्याचे काम चालू आहे. या कामामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या राज्यांकडून जोरदार विरोध होतो आहे. या राज्यांमध्ये सामान्य मतदार आणि हे स्थलांतरित मोठ्या संख्येने मोर्चे काढताना दिसत आहेत. कॅलिफोर्निया अंतर्गत येणार्या लॉस एंजेलिस शहरात, गेल्या आठवड्यात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे लोण आता इतर शहरांतही पसरताना दिसत असून, ते त्याची तीव्रता वाढण्याची लक्षणे आहेत. सध्यातरी हे मोर्चे विशेषतः डेमोक्रॅटिक पक्षाच्या राज्यांमध्येच पसरत आहेत.

कॅलिफोर्निया शतकापूर्वी मेसिको देशाचा भूभाग होता, जो अमेरिकेने मेसिकोकडून खरेदी केला. याच कॅलिफोर्नियामधून अमेरिकेतून फुटण्याच्या घोषणा ऐकू येत आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या वर्चस्वाखालील इतर राज्यांमध्येही असेच फुटीरतेचे ध्वनी पुढील काळात एकू येण्याची शक्यता आहे. कॅलिफोर्नियाकडे स्वतःचे पोलीसदल असतानाही, लॉस एंजेलिसमध्ये उसळलेल्या दंगली काबूत आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल सरकारचे नॅशनल गार्डस लॉस एंजेलिसमध्ये पाठविले. त्यामुळे राज्य सरकार आणि फेडरल सरकारमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या दंगली पूर्वनियोजित असाव्यात, ज्याला ट्रम्पविरोधी मार्सवादी लोकांचा पाठिंबा होता, हे पुढे आले.

डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला असणार्या कॅलिफोर्नियासारख्या राज्यामध्ये, तेथील दुकानांमध्ये चोर्यामार्या करणार्यांना ‘व्यवस्थेचे बळी’ संबोधून, त्यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई करू नये, असा कायदाच संमत करण्यात आला. कायद्याचे राज्य या व्यवस्थेला सुरुंग लावणार्या आणि अराजकता पसरवणार्या या कृती होत्या. यालाच ‘वोकिझम’ असे गोंडस नावही देण्यात आले. समलैंगिकांना, लिंग बदल करू इच्छिणार्यांना प्रोत्साहन, हे सर्व ’वोकिझम’च्या अंतर्गतच येते.

अमेरिकेची वाटचाल सध्या मुक्त अर्थव्यवस्थेकडून संरक्षित बाजारपेठेकडे चालू झाली आहे. ट्रम्प सरकार उलथवून लावण्यासाठी सुरु असलेले आंदोलन ही डावी मंडळी, अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये घेऊन जाऊ इच्छितात. त्यातच ट्रम्प यांचे पाठीराखे, ट्रम्प यांनी अमेरिकेला इस्रायल-इराण युद्धात ओढल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्यावरील ही नाराजी कोणत्या थरापर्यंत जाऊ शकेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. त्यातच अमेरिकेतील महागाईने उच्चांक गाठला असून, सर्वसामान्य मतदाता ट्रम्प सरकारवर नाराज आहे. घर विकत घेणे ही अमेरिकेतील सर्वसामान्य लोकांसाठी अशय गोष्ट झाली आहे. अमेरिकेचे जगन्मान्य चलन अमेरिकन डॉलर हे गटांगळ्या खात असून, फेडरल बँकेने ‘क्रिप्टो’ चलनाला घर खरेदीसाठी स्वीकारण्याचे जाहीर केले आहे.
‘मार्सवादी विचारधारेशी संलग्न असणार्या लोकांच्या संपत्तीचे समान वाटप’ अशा सामान्य लोकांना आकर्षित करणार्या घोषणांची, अमेरिकेतील दंगलींमध्ये चलती आहे. ‘टेक्सास’च्या मेयरपदासाठी निवडणूक लढविणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार झोहरान ममदानी यांनी निवडणुकीची प्राथमिक फेरी जिंकली असली, तरी त्यांच्या भाषणामध्ये या ‘संपत्तीचे समान वाटप’ या घोषणेचा वारंवार उल्लेख होताना दिसत आहे. ‘टेक्सास’चे इस्लामीकरण आणि तेथे अराजकतेचे पर्व सुरू होण्याची ही चिन्हे आहेत. कम्युनिस्ट राजवटीत सर्वसामान्य नागरिकांचे जीवन किती असुरक्षित आणि हलाखीचे असते, याची अमेरिकन युवा मतदाराला कल्पना नाही. गेली अनेक दशके अमेरिकेच्या मतदारांनी संरक्षित अर्थव्यवस्थेच्या वातावरणात व्यतीत केलेली आहेत. त्यामुळे त्यांना भविष्यातील धोके दिसत नाहीत.

अमेरिकेला भांडवलशाही देश म्हणून हिणवले गेले असले, तरी अमेरिकेची वाटचाल ही मार्सवादाकडे होते आहे. अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी इतकी वर्षे भांडवलशाहीचे फायदे उचलून समृद्धी, सुबत्ता, स्वातंत्र्य अनुभवले. सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावतच गेला पण, अमेरिकन डॉलर आणि युरोपातील इतर चलनांची अधोगतीकडे सुरु असलेली वाटचाल बघता, लोकांमधील असंतोषाला वाट करून देण्यासाठी कम्युनिस्टांनीच पाश्चात्य सभ्यतेचा विध्वंस घडवणण्याची योजना बनविली आहे, अशी शंका घेण्यास वाव आहे.जे अमेरिकेत घडेल, त्याचे वारे इतर देशात पसरण्याची शयता आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हरल्यामुळे, पुढील चार वर्षे डेमोक्रॅटिक पक्षाला त्यांचा अजेंडा अमेरिकेत राबविता येणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना सुरळीतपणे कारभार करता येऊ नये, म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाने या हालचाली चालविल्या आहेत. अमेरिकेत भविष्यात घडू शकणार्या घटनांवर चित्रपट बनविले जातात. कोरोना विषाणूच्या साथीमुळे होणारे हाहाकार दर्शविणारा ‘कॉन्टेजियन’ नावाचा चित्रपट २०११ साली आला होता. या चित्रपटाचा दिग्दर्शक होता स्टीवन सोडरबर्ग. याचप्रमाणे येत्या काळात अमेरिकेत पसरू शकणार्या ‘यादवीची’ कथा सांगणारा चित्रपट ’सिव्हिल वॉर’ २०२४ साली येऊन गेला. या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे अलेस गारलॅण्ड. या योगायोगाच्या गोष्टी नाहीत. येऊ शकणार्या ‘यादवीची’ पटकथा यापूर्वीच लिहिली गेली आहे.

अमेरिकेत कुटुंबव्यवस्था फार पूर्वीच उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळेच तेथील नागरिक आणि विशेषतः युवा वर्गामध्ये तुटलेपणाची आणि निराशेची भावना आहे. या भावनेलाच फुंकर मारण्याचे काम डावे आणि पुरोगामी डेमोक्रॅटिक पक्षाच्या पुढार्यांकडून होताना दिसते. अमेरिकेचे एकेकाळचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी अमेरिकेतील संसदेसमोर भाषण करताना, ‘माय फेलो इमिग्रण्टस’ (माझे स्थलांतरित सहकारी) असा उल्लेख केला होता. कारण, अमेरिका हा विविध देशांमधून आलेल्या, विविध धर्मांच्या, विविध वंशांच्या, विविध भाषा बोलणार्या लोकांनी बनलेला आहे. त्यामुळे स्वतःच्या उत्थानासाठी अमेरिकेत आलेल्या लोकांचा समूह असे म्हणता येते. अमेरिकेत आतापर्यंत कॅथलिक, अॅग्लो सॅसन प्रोटेस्टंट्स लोकांचा वरचष्मा होता पण, आता इस्लामिक देशांमधून आलेल्या स्थलांतरितांमुळे, अमेरिकेची ही जुनी ओळख पण पुसली जाताना दिसत आहे.
लॅटिन अमेरिकेतील मेसिको, कोलंबिया, व्हेनेझुएला यांसारख्या इतर देशांमधूनही बहुसंख्य स्थलांतरित अमेरिकेत आले आहेत. त्यांच्यासाठी त्यांचा चरितार्थ महत्त्वाचा असून, देशप्रेम वगैरे त्यांच्यासाठी दुय्यम आहे. त्यामुळे अमेरिकेत सध्या डाव्या, पुरोगामी लोकांचीच चलती आहे. त्यामुळे ट्रम्प यांना हुकूमशहा ठरवून, त्यांना अगदी जीवे मारण्यापर्यंतच्या वल्गना की धमया, या अवैध स्थलांतरितांकडून दिल्या जातात. त्यामुळे अमेरिकेत रस्त्यावर उतरून, ट्रम्प यांचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम आणि लॉस एंजेल्सच्या महापौर करेन बस यांचा या रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना पाठिंबा आहे. थोडयात फेडरल सरकारविरोधात राज्य सरकार उभे राहिलेले दिसते आहे.

अमेरिकेतील न्यायव्यवस्थेमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात, न्यायाधीशांची भरती करण्यात आली होती. डेमोक्रॅटिक पक्षाबद्दल सहानभूती असणार्या न्यायाधीशांची अमेरिकेत गर्दी आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या प्रत्येक निर्णयाला, न्यायपालिकांच्या सर्व स्तरांवर विरोध होताना दिसतो. याचाही मोठा फटका ट्रम्प सरकारला बसतो आहे. ट्रम्प हे सध्या अमेरिकेतील नागरिक आणि अमेरिकेबाहेरील देशांबरोबर संघर्ष करताना दिसत आहेत. अमेरिकेची शिक्षण व्यवस्थाच धोयात आलेली आहे. एलॉन मास्क हे चार वर्षे विद्यापीठात शिकून मिळालेली पदवी बिनकामाची आहे, असे जाहीरपणे बोलतात. कौशल्य आधारित लोकांनाच यापुढे कामे मिळतील, असेही मस्क सांगतात.

अमेरिकेत येऊ शकणारे हे ‘यादवीचे’ वादळ कोणत्या स्वरूपात येते आणि त्याचा मुकाबला डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार कसे करतात, याकडे जगाचे लक्ष असेल.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121