आयआयडीएलच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती

    30-Sep-2022
Total Views | 40
 
RMP
 
 
मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा भाग असलेल्या आयआयडीएल इंडियन इन्स्टिटयूट ऑफ डेमॉक्रेटिक लीडरशीप (IIDL) या संस्थेने नुकतीच आपली पाच वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने आयआयडीएलच्या कार्य अहवालाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे. या सर्वसमावेशक पंचवार्षिक अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक तथा आयआयडीएलचे (IIDL) डीन रवींद्र साठे, आयआयडीएलचे (IIDL) अभ्यासक्रम संचालक तथा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे मुख्य शैक्षणिक अधिकारी देवेंद्र पै यांच्यासह प्रबोधिनीचे इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
 
 
आयआयडीएलच्या या अहवालात संस्थेने केलेली वाटचाल, प्रवास, स्थापना, संस्थेत झालेले कार्यक्रम, संस्थेच्या माध्यमातून झालेले अभ्यास दौरे, आयआयडीएलला दिग्गज मान्यवरांनी दिलेल्या भेटी, संस्थेत शिकून उच्च पदावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती यासह अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा समावेश करण्यात आला आहे.
 
 
बदलत्या भारतात देशाचे भवितव्य घडवण्यात राजकीय, सामाजिक आणि माध्यमांतील व्यक्तींचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांना प्रशिक्षित आणि सुशिक्षित करण्यासाठी मागील पाच वर्षांपासून म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून आयआयडीएल नव्या नेतृत्वाला घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयआयडीएलमार्फत एक अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असून त्यात त्यांना राजकारण, प्रशासन आणि जनतेशी संबंधित विषयांवर आपली कारकीर्द घडवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. काही आठवड्यांपूर्वी आयआयडीएलच्या विद्यार्थ्यांचा मलेशिया येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121