कोण आहेत आदित्य ठाकरे: तानाजी सावंत

    02-Aug-2022
Total Views | 114

sawant
 
 
 
मुंबई: शिवसेना नेता आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यानंतर आता पुण्यात पोहोचले आहेत. पुण्यातील कात्रज चौकात आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. हे ठिकाण एकनाथ शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयापासून काही अंतरावर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पुण्यात आढावा बैठकीसाठी हजर असतील.
 
 
आदित्य ठाकरे यांची सभा नेमका हाच मुहूर्त साधून कात्रज चौकात ठेवण्यात आली का? आदित्य ठाकरे मुद्दाम तुमच्या विरोधात शक्तीप्रदर्शन करत आहेत का? असे प्रश्न सावंत यांना विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे देताना तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. "आदित्य ठाकरेंच शक्तीप्रदर्शन कसलं, त्यांचा तर शक्तिपात झाला आहे. आमची सर्व शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे. एकही शिवसैनिक त्यांच्या पाठीशी राहिलेला नाही. आदित्य ठाकरे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्व मी त्याला देत नाही. " असे सावंत म्हणाले.
 
 
एकनाथ शिंदे गटाच्या उठावानंतर शिवसैनिकांकडून तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. मात्र, शिवसैनिकांनी नाही तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भगवा शेला घालून तोडफोड केली, असा खुलासा सावंत यांनी केला. शिवाय सोबत दोनच शिवसैनिक असल्याचे सांगितले.
 
 
 
  
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121