मुंबई : " राऊतांनी केलेला सगळं भ्रष्टाचार आता उघड होणार, संजय राऊतांना सगळे हिशेब चुकते करावेच लागणार अशा शब्दांत ट्विट करत भाजपनेते किरीट सोमैय्या यांनी संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या संजय राऊत यांना ईडी कार्यालयात हजार राहण्याची नोटिस बजावण्यात आली आहे. प्रत्राचाळ प्रकरणात तब्बल १०३४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ईडीच्या आरोपपत्रात ठेवला आहे. संजय राऊत यांचे व्यावसायिक भागीदार प्रवीण राऊत हेही या प्रकरणातील सहआरोपी आहेत.
गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात विकासक प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या ताब्यातील भूखंड परस्पर खासगी विकासकाला विकल्याचे उघड झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती. याआधी मी ईडीच्या दबावासमोर झुकणार नाही अशा वल्गना करणाऱ्या संजय राऊत यांनी सपशेल शरणागती पत्करत ईडीच्या कार्यालयात हजार राहण्याचा निणय घेतला आहे.