नवी मुंबई : कोपरखैरणे एमआयडीसीतील वेस्ट क्लाय पॉलिकॅब रासायनिक कंपनीला दुपारी भीषण आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की जवळच्या चार कंपन्याही जळून राख झाल्या आहेत. पाच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. प्रशासनकाढून आगीवर नियंत्रण मिळ्वण्याचा प्रयत्न सुरु असल्या कारणानं, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांचाकडून करण्यात आलं. आग नेमकी कशामुळे लागली ह्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.