ज्या दोन मुद्यांवर मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं त्या मुद्यांचा पुनर्विचार न्यायमुर्ती करणार असल्याचे मराठा समन्वयक आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी १०० टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
Read More
मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत आपलं उपोषण मागे घेतलं आहे. यावेळी त्यांनी सरकारला अनेक मागण्या केल्या आहेत. याबाबत मराठा समाज नेते विनोद पाटील माध्यमांशी संवाद साधला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुनील कावळे (४५ वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. सुनील कावळे जालन्याचे रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचं औरंगाबादेत निषेध आंदोलन सुरू
: राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ५ मी रोजी रद्द केले. त्यानंतर आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर याचिकाकर्ते विनोद पाटील फेरविचार याचिका दाखल करणार आहेत.
स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. या काळात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना होऊन हे प्रकरण सुनावणीसाठी लिस्टींग व्हावे यासाठी सरकार अर्ज करू शकणार आहे.
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही सोमवारी मराठा आरक्षणाबाबात तातडीने सुनावणी घ्यावी यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची मागणी केली आहे.