‘माणिक’ निवडीचा अन्वयार्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2022   
Total Views |
 
  
 

himachal cm 
 
 
 
 
 
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांना हटवून त्यांच्याजागी डॉ. माणिक साहा यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे. माणिक हे सध्या त्रिपुरातून राज्यसभेचे खासदार असून, त्रिपुरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि ‘त्रिपुरा क्रिकेट असोसिएशन’चे अध्यक्षही आहेत. बिप्लब यांना हटविल्यानंतर त्यांच्याजागी उपमुख्यमंत्री जिष्णू देव यांची वर्णी लागेल, अशी चर्चा असतानाच भाजपने धक्कातंत्राचा वापर करत माणिक यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. मात्र, पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक असताना माणिक यांच्यावर पक्षाने विश्वास का दाखवला, हे पाहणे महत्त्वाचे आहे. काही दिवसांपासून अनेक आमदार पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. तसेच, देव यांच्या वक्तव्यांनी भाजप अनेकदा अडचणीत आला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी सर्वसमावेशक आणि संयमित चेहरा महत्त्वाचा होता. व्यवसायाने डॉक्टर असलेले माणिक २०१६ साली काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. त्रिपुरातील अभूतपूर्व विजयानंतर माणिक यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आले. तसेच, राज्यसभेवरही पाठवण्यात आले. संघटनात्मक पातळीवर माणिक यांनी जबरदस्त काम करून प्रदेश भाजपमधील नेत्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. डॉ. माणिक जास्त न बोलता शांतपणे काम करण्यास प्राधान्य देतात. अतिशय सामान्य राहणीमान आणि त्यांचे स्वच्छ चारित्र्य या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. त्रिपुरा राज्यसभेची जागा जिंकणेही तसे अवघड होते. मात्र, माणिक यांनी आपले राजकीय कौशल्य आणि ताकदीचा वापर करत माजी मंत्री व ‘सीपीएम’चे आमदार भानुलाल साहा यांना पराभूत केले. गेल्यावर्षीच्या ‘स्थानिक स्वराज्य संस्थां’च्या निवडणुकीत भाजपने भले यश मिळवले असेल, मात्र तृणमूल काँग्रेस तिसरा मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे ‘सीपीएम’बरोबरच भाजपपुढे आता तृणमूलचेही मोठे आव्हान आहे. बिप्लब यांच्याविरोधात पक्षातच मोठा असंतोष होता. त्यामुळे भाजपने वेळीच सावध होत माणिक यांची निवड करून आपली स्थिती भक्कम केली आहे. दरम्यान, बिप्लब यांना आता प्रदेशाध्यक्ष बनवून किंवा राज्यसभेवर पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते. भाजपला त्रिपुराचे राजकारण समजणारा आणि संघटनात्मक पातळीवर मजबूत पकड असणारा व्यक्ती आवश्यक होता, जो माणिक यांच्या रूपाने मिळाला, अशी चर्चा आहे.
 
 
ताई असं बोलणं बरं नव्हं!
 
 
समृती इराणी यांच्या नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या दरम्यान महिला कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. त्यावर जळगावातील महागाईविरोधातील आंदोलनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अत्यंत क्रोधित झाल्या. त्यांनी “यानंतर महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने महिलेवर हात उगारण्याचा प्रयत्न केल्यास तर मी स्वतः तिथे जाईन, त्याच्याविरोधात न्यायालयात केस करेन आणि त्याचे हात तोडून हातात देईन,” असा इशाराच दिला. कुठल्याही महिलेला मारहाण होणे हे समर्थनीय नाहीच. पण, राष्ट्रवादीत किती गोडीगुलाबीने लोकशाही नांदत आहे, हे अख्खा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोे आहे. राष्ट्रवादीचा पदाधिकारी मेहबूब शेखवर लागलेल्या आरोपांवर सुप्रिया ताई शांत होत्या. तेव्हा त्या शेखचे हात तोडायला का गेल्या नाहीत? मंत्री जितेंद्र आव्हाड, तर बंगल्यावर मारहाण करतात. तिकडे फेसबुकवर आधी मनसे आणि आता राष्ट्रवादीच्या बाजूने बोलणार्‍या रुपाली ठोंबरे तर घरात घुसून मारण्याच्या आणि चोपण्याच्या धमक्या देतात. गोपीचंद पडळकरांवर भरदिवसा हल्ला केला जातो. सदाभाऊ खोत यांच्या कार्यालयात घुसून आंदोलन केले जाते. तिकडे अमोल मिटकरी यांनी केलेले वक्तव्य सुळेताई जाणूनबुजून विसरतात. उलट निषेध करणार्‍या ब्राह्मण महिलांनाच नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी केली, अशी यादी निघाली ती खूप दूरवर जाते. पण, प्रश्न हा आहे की, शांत, संयमी आणि सुसंस्कृतपणाचे दाखले देणार्‍या सुप्रियाताई अचानक इतक्या कठोर का झाल्या? शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांनी मोदींची गाडी फोडण्याच्या धमक्या दिल्या. किरीट सोमय्यांवरही भ्याड हल्ला झाला. नुकतेच केतकी चितळेवर अंडी फेकली गेली. केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांच्या ताफ्यावरही अंडी फेकण्याचा प्रयत्न होतो. मात्र, तरीही सुळेताई विसरतात की, महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षाचा गृहमंत्री आहे. भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीने उगाच नाक खुपसायची गरजच काय, तिथे त्यांना निमंत्रणही नव्हते. मात्र, आधी ‘पब्लिसिटी स्टंट’ करायचा आणि नंतर ही हात तोडण्याची भाषा. सुप्रियाताई असं बोलणं बरं नव्हे!
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@