इतर धर्मीयांच्या भागात भोंग्यांचे ध्वनिप्रदूषण का?

वडाळ्यातील नागरिकांचा सवाल

    11-Apr-2022
Total Views | 66
 
 
masjid
 
 
मुंबई : विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचे ध्वनिप्रदूषण इतर धर्मीयांच्या भागात का, असा सवाल वडाळा येथील नागरिकांनी विचारला आहे. वडाळा येथे प्रभू श्री रामाचे मंदिर आहे. त्यासमोरच हुनमान मंदिर आहे. वड्याळ्यामध्येच प्रसिद्ध विठ्ठल मंदिरही आणि जैन मंदिरदेखील आहे. या सर्व मंदिरांमध्ये नित्यनेमाने पूजापाठ होतो. शेकडो भाविक याठिकाणी येतात. परंतु, या परिसरात प्लॉट नं. १० मधील एका विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवरील कर्णकर्कश भोंग्यांमुळे भल्या पहाटेपासून दररोज मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या कर्णकर्कश भोंग्यांमुळे या परिसरातील नागरिकांना ध्वनिप्रदूषणाचा सामना करावा लागतो. या भागात अनेक मंदिरे आहेत. परंतु, यामधून कोणत्याही प्रकारचे ध्वनिप्रदूषण होत नाही.
 
 
मोठ्या प्रमाणात याठिकाणी हिंदू धर्मीय नागरिक वास्तव्यास आहेत. शासनाच्या सर्व निमयमांचे पालन करूनच या सर्व मंदिरांमध्ये सण, उत्सव साजरे केले जातात. परंतु, असे असतानाही या परिसरात मात्र, विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थना स्थळावरून पहाटे ५ वाजल्यापासून कर्णकर्कश भोंग्यांमुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. या भोंग्यांतून ऐकू येणार्‍या प्रार्थनेबद्दल बहुसंख्य लोकांना काहीच कळत नाही. मग, या भोंग्यातून येणारा हा आवाज नेमका कुणासाठी असतो, असा सवालही वडाळा येथील नागरिक विचारत आहेत.
 
 
भोंग्यांवरून शिवसेना भवनासमोरच मनसे आक्रमक
 
दादर येथील शिवसेना भवनासमोरच मनसेने भोंग्यांवरून आक्रमक पवित्रा घेतल्याचे रविवारी पाहायला मिळाले. या परिसरात हनुमान चालीसाचे पठण सुरू केल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी मनसे पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतले.
 
 
भोंग्यांमुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाला विरोध
 
सर्वधर्मीयांनी आपापल्या प्रार्थना आपल्या घरी किंवा प्रार्थनास्थळी कराव्यात. विशिष्ट धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवरील कर्णकर्कश भोंग्यांमुळे आजारी, वयोवृद्ध आणि विद्यार्थ्यांना किती त्रास होतो, हे त्यांचे त्यांनाच माहिती. आमचा कोणत्याही धर्माला किंवा कुणाच्या श्रद्धेला विरोध नाही. पण, भोंग्यांमुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाला विरोध आहे. ते तत्काळ हटवलेच पाहिजेत.
- बाबुभाई भवानजी, माजी उपमहापौर, मुंबई
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121