भगव्याचे वावडे कशासाठी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2022   
Total Views |

nashik
 
 
 
अवघ्या देशभरातच ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अनेक ठिकाणी या चित्रपटाला आणि प्रेक्षकांना येनकेन प्रकारे डिवचण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून चित्रपट नवनवे विक्रम आपल्या नावावर करत आहे. दरम्यान, नाशिकमधील कॉलेजरोड येथील एका चित्रपटगृहात खास महिलांचा एक गट चित्रपट पाहण्यासाठी आला होता. यावेळी त्यांनी या गटाची ओळख म्हणून भगव्या रंगाच्या शाली परिधान केल्या होत्या. मात्र, या महिलांनी परिधान केलेल्या शालींवर चित्रपटगृह व्यवस्थापनाने आक्षेप घेत त्या जमा करून मग चित्रपटगृहात प्रवेश दिला. यावर नंतर या महिला आम्ही चित्रपटगृह प्रशासनामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत सामंजस्याने प्रकरण मिटवण्यात आले. महिलांनी चित्रपटगृह प्रशासनाच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त करत ‘जय श्री राम’ आणि ‘भारतमाता की जय’, अशा घोषणाही दिल्या. ही फक्त नाशिकमधील एक घटना आहे. मात्र, देशभरात या चित्रपटाला आणि प्रेक्षकांना अशाच प्रकारे अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच आदिलाबादमधील एका चित्रपटगृहात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्याचा प्रकार ‘व्हायरल’ झाला होता. राजस्थानच्या कोटामध्येही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेसाठी दि. २२ मार्च ते २१ एप्रिल दरम्यान ‘कर्फ्यू’ लावला आहे. या एका महिन्याच्या काळात मेळावे, आंदोलन, मिरवणूक, पदयात्रा यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधल्या अलीगढमध्येही ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रयोगादरम्यान गोंधळ झाल्याचे पाहायले मिळाले. अलीगढच्या टॉकिजमध्ये चित्रपटाची प्रिंट खराब असल्याने प्रेक्षकांनी गोंधळ घातला. नोएडामध्येही चित्रपटाचा चालू ‘शो’ अचानक बंद पाडल्याने मोठा वाद निर्माण झाला. एकूणच चित्रपट इतिहास घडवत असताना हिंदूद्वेष्ट्यांचा जळफळाट मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने समोर येऊ लागला आहे. बुरखा, ‘हिजाब’, टोपी अशा गोष्टींना कधीच कुणाला आक्षेप नसतो, मग नेमका भगवा रंग दिसला की, तेव्हाच त्रास होण्याचे कारण काय... आज भगव्या शालीला नकार दिला गेला, उद्या प्रत्येक भगवा रंगाच्या वस्तूला हाच नियम लागू होणार का...? उगवत्या भगव्या सूर्याला कधीही रोखता येत नाही, हे जरी किमान लक्षात ठेवले तरी खूप झाले!
 
 
 
बसवराज बोम्मईंचा पलटवार!
 
कर्नाटकातील महाविद्यालयांमधील ‘हिजाब’बंदीला कर्नाटक उच्च न्यायालयाने वैध ठरवत धर्मांधांना चांगलाच दणका दिला. या आदेशाविरोधात मुस्लीम संघटनांनी बंदची हाक दिल्यानंतर मुस्लीम दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले. शिमोगा येथील ऐतिहासिक कोटे मरीकंबा जत्रे’च्या आयोजन समितीनेही दि. २२ मार्चपासून सुरू झालेल्या पाच दिवसीय उत्सवात केवळ हिंदूच ‘स्टॉल’ लावू शकतात असे सांगितले. पाहता पाहता दक्षिण कन्नड, उडुपी आणि शिमोगा येथील अनेक मंदिरांत हा मुद्दा पोहोचला. त्यामुळे गैर-हिंदूंना दुकाने खाली करण्यास सांगत मंदिराबाहेरील व्यवसायही थांबवण्यास सांगितले गेले. मुस्लीम दुकानदारांना जत्रेत आपला माल विकण्यावरही बंदी घातली गेली. ‘हिजाब’नंतर पुन्हा एकदा निर्माण झालेल्या वादंगानंतर कर्नाटक विधानसभेतही हा मुद्दा उचलण्यात आला. यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नियमानुसार गैर-हिंदूंना मंदिरांजवळ व्यवसाय करण्याची परवानगी नसल्यामुळे, मुस्लीम व्यापारी आणि विक्रेत्यांवर बंदी घालणार्‍या मंदिर अधिकार्‍यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी काँग्रेसनेच बनविलेल्या कायद्याचा हवाला दिला. त्यामुळे दुफळी माजवण्यासाठी आतुर असलेली कर्नाटक काँग्रेस तोंडघशी पडली. हिंदू संस्थांजवळील जमीन, इमारत किंवा जागेसह अन्य कोणतीही मालमत्ता गैर-हिंदूंना भाड्याने दिली जाणार नसल्याचा हा नियम २००२ मध्ये काँग्रेसच्या एस. एम. कृष्णा सरकारनेच केला. ‘कर्नाटक धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणगी कायदा,२००२’च्या ‘नियम १२’मध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. मात्र, हा नियम मंदिराच्या बाहेरील रस्त्यावरील विक्रेत्यांवर लागू होत नाही आणि जे इतर समुदायातील लोकांना रोखण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर सरकार कारवाई करू शकते, असे कायदा मंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी यावेळी सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधित धर्माच्या विक्रेत्यांना मदत व्हावी, म्हणून या कायद्याची निर्मिती करण्यात आली. हिंदूंना मशिदी किंवा चर्चजवळ व्यापार करण्यासही परवानगी नव्हती. कायदे काँग्रेसनेच बनवायचे आणि पुन्हा ते विसरूनदेखील जायचे. म्हणूनच दुफळी माजवण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसचा बोम्मई यांनी हाणून पाडलेला डाव काँग्रेसच्या जिव्हारी लागला नसेल तरच नवल!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@