दोन्ही पवार एकत्र येण्यास कुणाचा विरोध? राऊतांचं म्हणणं काय?

    30-May-2025
Total Views |
 
Sanjay Raut
 
मुंबई : दोन्ही पवार एकत्र येण्यास सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध आहे, असा दावा उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
 
संजय राऊत म्हणाले की, "आजही अजित पवारांचा पक्ष शरद पवार आमचे नेते आहे असे सांगतात. शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असे ते सांगतात.आपण एकत्र आलो पाहिजेत असेही ते म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाहीत. जो तो आपापला राजकीय फायदा, तोटा पाहत असतो."
 
हे वाचलंत का? -  तेव्हाच्या 'महाविकास आघाडी कराची' आज वसूली! मालमत्ता करवाढीवरून मंत्री आशिष शेलारांची टीका
 
"प्रफुल्ल पटेल हे काही महान नेते नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे. आता तटकरे हे त्यांच्या एका गटाचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष विलीन होणार नाही, अशी मला माहिती आहे. पण विलीन झाला तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकरेंनी काय करायचे? केंद्रातील मंत्रीपदाचा प्रश्न निर्माण होईल. प्रत्येकजण राजकारणात आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा पाहतो. तसेच हेदेखील आहे," असे संजय राऊत म्हणाले.