अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा

पंतप्रधान मोदींविषयी आक्षेपार्ह विधान सोलापुरातील भाजपा कार्यकर्ता आक्रमक

    11-Dec-2022
Total Views | 127
 
अमोल मिटकरी
 
 
 
 
 
  
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्याविरुद्ध सोलापूरच्या सदर बाझार पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.
 
 
सोलापूर भाजपाचे शहर चिटणीस अनिल कंदलगी यांनी याबाबतची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी दि. ९ डिसेंबर रोजी सोलापूर येथील एका सभेत भाषण करताना हेतुपुरस्सर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने विधान केले. जनतेचा प्रतिनिधी असल्याचे भान न ठेवता त्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह व समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देश होता. अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे सामाजिक व भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात भादंवि १५३, अ, ५००, ५०५ (२) नुसार गुन्हा नोदवावा अशी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सोलापूर सदर बाझार पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
यावेळी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख , उपाध्यक्ष विजया वड्डेपल्ली,चिटणीस अनिल कंदलगी, चिटणीस नागेश सरगम मंडळ अध्यक्ष सुनील गौडगाव, सोशल मीडिया संयोजक योगेश गिराम, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश साखरे, प्रेम भोगडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राम वाघसे, एससी मोर्चा अध्यक्ष बाबुराव संगेपांग व पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
कोट
 
मिटकरींच्या त्या व्यक्त्व्यावरून आमच्या भावना दुखावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा त्यांचा हेतुपुरस्सर प्रयत्न होता. त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह व समाजात तेढ निर्माण करणारे आहे. मिटकरींवर गुन्हा दाखल व्हावा.
-अनिल कंदलगी, तक्रारकर्ते
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121